Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : पाठवणीच्यावेळी नवरी राहीली बाजूला अन् नवराच रडायला लागला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

Social Viral : पाठवणीच्यावेळी नवरी राहीली बाजूला अन् नवराच रडायला लागला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

Social Viral : वराला रडताना पाहून आजूबाजूला उपस्थित वऱ्हाडींनाही एक मिनिटासाठी धक्का बसला आणि त्यांना आपले हसू आवरता आले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 01:03 PM2022-05-02T13:03:06+5:302022-05-02T13:36:35+5:30

Social Viral : वराला रडताना पाहून आजूबाजूला उपस्थित वऱ्हाडींनाही एक मिनिटासाठी धक्का बसला आणि त्यांना आपले हसू आवरता आले नाही.

Social Viral : Bride groom video groom sudden crying after marriage video viral on social media  | Social Viral : पाठवणीच्यावेळी नवरी राहीली बाजूला अन् नवराच रडायला लागला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

Social Viral : पाठवणीच्यावेळी नवरी राहीली बाजूला अन् नवराच रडायला लागला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

बहुतेक लग्नाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पाहिले आणि शेअर केले जातात. त्यातील काही खूप मजेदार आहेत, काही हृदयाला स्पर्श करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो तुम्ही जितक्या वेळा पाहाल तितका कमी आहे. व्हिडिओमध्ये वराला निरोप देताना रडताना दिसत आहे. वराला रडताना पाहून आजूबाजूला उपस्थित वऱ्हाडींनाही एक मिनिटासाठी धक्का बसला आणि त्यांना आपले हसू आवरता आले नाही. (Bride groom video groom sudden crying after marriage video viral on social media)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्न समारंभाशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये नववधू तिच्या सासरी निघताना दिसत आहे. साधारणपणे, तुम्ही नववधू आणि तिच्या कुटुंबीयांना निरोप देताना रडताना पाहिलं असेल, पण या व्हिडिओमध्ये वधू नाही तर वरच रडताना दिसत आहे. हे पाहून आजूबाजूला उपस्थित लोकांना हसू आवरता आलं नाही.यादरम्यान वधूच्या प्रतिक्रिया पाहावयास मिळतात.

 नादच खुळा! हळदीत नाचता नाचता पोरीच्या प्रेमात पडला; अन् भर मंडपात नंबरसुद्धा दिला

निरोप देताना वराची मजेशीर शैली पाहून काही काळ भावूक झालेल्या वधूला हसू आवरता आले नाही. त्याचवेळी वधूच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून वरालाही आनंद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप बघितला जात आहे आणि लाइक केला जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'thebridesofindia' नावाच्या पेजवरही अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यांच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

Web Title: Social Viral : Bride groom video groom sudden crying after marriage video viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.