कोणत्याही लग्नात आकर्षणाचे केंद्र वधू-वर असतात. सर्व पाहुणे आणि नातेवाईकांच्या नजरा वधू-वरांवर खिळलेल्या असतात. लग्नात वधू-वरांसोबत फोटो काढण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो हे तुम्ही पाहिले असेलच. याशिवाय असे अनेक लोक आहेत जे केवळ मौजमजा करण्यासाठी लग्नाच्या स्टेजपर्यंत पोहोचतात. यात वराचे मित्र आघाडीवर आहेत. मित्र मैत्रिणींच्या गमतीशिवाय लग्न अपूर्णच वाटतं. (Bride sat on groom lap when friends did not give space relatives were surprised watch video)
सध्या सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वेगळीच गोष्ट सांगत आहे. या व्हिडिओमध्ये वधूला (Angry Bride) लग्नाच्या स्टेजवर बसायला जागा मिळाली नाही, तर पाहुणे आणि वरावर रागावून ती असे काही करते की सगळे तिला बघतच राहतात. वधूची ही कृती पाहून स्वतः वरालाही धक्का बसतो.
उन्हामुळे टॉयलेट, बाथरूममधून खूप गरम वाफा येतात; ५ ट्रिक्स, बाथरूम नेहमी राहील हवेशीर, थंडगार
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वर मित्रांसह लग्नाच्या मंचावर बसला आहे. या दरम्यान वधूचा प्रवेश होतो. वधू स्टेजवर पोहोचते, परंतु वराचे मित्र सोफ्यावरून उठत नाहीत. यामुळे वधूला राग येतो आणि ती सरळ जाऊन वराच्या मांडीवर बसते. वधूने असे करताच वराला धक्का बसतो.
काळे पडलेले स्विच बोर्ड २ मिनिटात होतील स्वच्छ; फक्त ३ उपाय करा, घर नेहमी दिसेल चकाचक
वधूचे असे कृत्य पाहून वरासह पाहुणेही आश्चर्यचकित होतात. स्टेजवर वरासोबत बसलेले मित्र आणि पाहुणे वधूकडे नुसतेच बघत असल्याचे तुम्ही पाहू शकता. वधूने पाहुण्यांसमोर असे का केले हे कोणालाच समजत नाही. व्हिडिओतील पाहुण्यांचे चेहरे पाहण्यासारखे आहेत. मात्र, काही लोकांना हा ब्राइडल स्वॅग खूप आवडला आहे.