वधू-वरांच्या (Bride Groom) गमतीचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. लग्नाचा सिजन सुरू असताना, पारुल गर्ग नावाच्या मेकअप आर्टिस्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला तिचा व्हिडिओ सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहेत. हा व्हिडीओ एवढा मजेशीर आहे की तुम्ही हसू आवरू शकणार नाही. (Bride tease groom during varmala did this on stage see funny viral video)
हा व्हिडीओ एका लग्नाचा आहे, जिथे वधू आणि वर एकमेकांना हार घालण्यासाठी स्टेजवर उभे आहेत. व्हिडिओमध्ये वधू आणि वर एकमेकांसमोर उभे असल्याचे दिसत आहे. पण व्हिडिओचा सर्वात मनोरंजक भाग तेव्हा येतो जेव्हा वराने वधूला हार घालण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान, वराला थोडा त्रास देण्यासाठी वधू तिच्या लवचिक कंबरेचा फायदा घेते, वर तिच्या गळ्यात पुष्पहार घालण्यासाठी पुढे जाते. ती पुढे मागे झुकते. ती पूर्णपणे मागे झुकते. तिथे उभे असलेले सर्वजण हसू लागतात. वधू-वरही एकमेकांकडे बघून हसायला लागतात.
बोंबला! लोकांना जेवण्याची योग्य पद्धत शिकवायला गेली अन् स्वत:च ट्रोल झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "बेंड इट लाईक..." 3 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यापासून व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यावर इन्स्टाग्राम युजर्सकडूनही अनेक प्रतिक्रिया आल्या. एका यूजरने लिहिले - दीदी नक्कीच योग शिक्षिका आहेत. दुसर्याने लिहिले - मी आयुष्यात प्रथमच मॅट्रिक्स असलेली वधू पाहिली आहे.