फेसबुकसारखे (Face Book) सोशल मीडियावर प्लॅटफॉम सतत वापरण्याची सवय अनेकांना असते. या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी एका माणसानं चक्क बाई कामाला ठेवली आहे. या महिलेची आगळी वेगळी नोकरी सध्या चर्चेत असून जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनीही या फोटोवर आपली रिएक्शन दिली आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योजक मनीष सेठी यांनी फेसबुक उघडल्यानंतर प्रत्येकवेळी त्यांना मारण्यासाठी एका महिलेला कामावर ठेवलं आहे. कारा नावाच्या या महिलेला मनीष यांची स्क्रिन पाहून कानाखाली मारण्यासाठी ८ डॉलर प्रती तास मिळणार आहेत. (CEO Hires Woman To Slap Him)
मनीष सेठी यांनी २०१२ मध्ये या महिलेला कामावर ठेवलं होतं. पण आज ९ वर्षांनी या पोस्टची चर्चा होण्याचं कारण असं की, टेस्लाचे सीईओ एलोन मस्कने २ फायर इमोजीचा वापर करून यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सेठी यांनी २०१२ च्या जाहिरातील लिहिलं होतं की, जेव्हा ही मी वेळ घालवत असेल तेव्हा तुम्ही मला ओरडायला हवं किंवा कानाखाली मारायला हवं.'' खाकीला सलाम! भर पावसात बेशुद्ध तरूणाला खांद्यावर घेत ती हॉस्पिटलला पोहोचली; पाहा व्हायरल व्हिडीओ
मनीष सेठी यांनी मस्क यांच्या प्रतिक्रियेवर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. सेठी यांनी काराला कानाखाली मारून क्षमता वाढवण्याचं श्रेय दिलं होतं. त्यांच्यामते दिवसभरात त्यांची काम करण्याची क्षमता जवळपास ३५ ते ४० टक्के होती. जेव्हा कारा यांच्या जवळ असायची तेव्हा क्षमता वाढून ९८ टक्के झाली. परळीतल्या नाचगाण्यामुळे चर्चेत आलेली सपना चौधरी कोण? ती कायमच का वादग्रस्त?