उत्खननासाठी किंवा मोठ्या वस्तू उचण्यासाठी महत्वाचं ठरणारं जेसीबी नेटिझन्सचं आवडता विषय बनलंय. जेसीबी की खुदाई प्रमाणेच सुएझ कालव्यात अडकलेल्या एव्हर गिव्हनच्या मदतीसाठी आलेले जेसीबी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. आता पुन्हा एकदा एका लग्न समारंभात जेसीबीमुळे हशा पिकलाय. (Couple uses excavator as seat at wedding reception falls)
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये फ्रिलचा पांढरा गाऊन घातलेली मुलगी नवरदेवाशेजारी बसली आहे. बहुतेकजण हे जोडपे मंचावर येण्याची कल्पना करत असताना, ही जोडी लाल रंगाच्या सॅटिन कापडाने सजलेल्या जड मशीनरीवरून खाली येताना दिसली. पण या जोडप्याला ही रॉयल एंट्री चांगली अंगाशी आली.
JCB wala bhul gaya Shaadi ka order hai 🤦♂️😝🤣🤣🤣 pic.twitter.com/wXJMDdjPb0
— Kungfu Pande 🇮🇳2.0 (@pb3060) November 28, 2021
जोडप्याच्य स्वागतासाठी टाळ्या, थम्स दाखवत असलेल्या मंडळीला हा प्रकार पाहून धक्काच बसतो. 'जेसीबी वाला भूल गया शादी का ऑर्डर है' म्हणजेच जेसीबी ऑपरेटर विसरतात की हे लग्नासाठी हवे होते. अशा आशयाचं कॅप्शन देत ट्विटरवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
लग्नासाठी एक अनोखा, मजेशीर प्रकार म्हणून उत्खनन यंत्र बुक करणे आनंददायक वाटू शकतं. पण यामुळे जोडप्यांना आणि पाहूणे मंडळींना किती दुखापत होऊ शकते याबाबत अनेकांनी चिंता व्यक्ती केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच मीम्सचा वर्षाव झाला. आतापर्यंत लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर या जोडप्यावर विनोदी कमेंट्स केल्या आहेत.