सध्या भारतात लग्नाचा मोसम सुरू आहे. लग्नाच्या निमित्ताने लोक अनेक व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. यामध्ये काही व्हिडिओ हृदयाला स्पर्श करणारे आहेत, तर काही व्हिडिओ हसवणारेही असतात. विवाहसोहळा भारतीय संस्कृती आणि संस्कारांची झलक दर्शवतो. आजकाल असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे, जो पाहून तुम्ही भारावून जाल. (Daughter in law sari disturbed then mother in law handled like this by sitting down watch video)
हा व्हिडिओ सासू आणि सुनेशी संबंधित आहे. नवविवाहित वधू आपल्या कुटुंबातील एका सदस्याच्या लग्नाला उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत तिची सासूही हजर असते. वधूच्या साडीच्या निऱ्या व्यवस्थित करण्यासाठी सासू तिच्या मदतीला येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वराची आई जमिनीवर बसून वधूची साडी व्यवस्थित करते.
रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्हा सासू आपल्या सुनेची साडी व्यवस्थि करत असते तेव्हा तिला खूप प्रेमाने विचारते की साडी व्यवस्थित आहे ना? प्रत्युत्तरात वधू हसायला लागते. व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर आशी शर्मा नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यासोबतच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'सासू माँ' असे लिहिले आहे.