सोशल मिडियावर लाईक्स मिळायच्या नावाखाली कोण काय करेल काही सांगता येत नाही. ही एक मैत्रिणही त्यातलीच. मॅटर्निटी फोटोशूट हा प्रकार आता खूप कॉमन झाला आहे. गरोदरपणातल्या रम्य आठवणी किंवा आपलं सौंदर्य टिपून ठेवण्यासाठी अनेक जणी ते हौशीने करतात. तसंच तिलाही वाटलं. पण त्यासाठी तिने चक्क फ्युनरल थीम निवडली आणि त्यासाठी थेट कब्रस्तानात जाऊन काळे कपडे घालून मॅटर्निटी फोटोशूट केलं (Funeral theme maternity photoshoot by a women in US...). पण बघा तिने असं का केलं.... ही गोष्ट आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील चेरिडन लॉग्सडन या २३ वर्षीय महिलेची...
विचित्र संकल्पना घेऊन चेरिडनने केलेलं मॅटर्निटी फोटोशूट सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
कारल्याचा कडवटपणा काही केल्या कमी होतच नाही? २ मस्त उपाय, कडू कारले होईल एकदम चमचमीत
काळे कपडे घालून आणि अतिशय दु:खी चेहरा करून तिने फोटोशूट केलं आहे. यामध्ये एक- दोन फोटोंमध्ये तर ती चक्क रडतानाही दिसत आहे. फोटोशूट करताना तिने तिच्या हातात सोनोग्राफीचे रिपोर्ट धरलेले आहेत. "R I P to the lifewithout kids" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
तिचे हे फोटो पाहून तिला ती असं का करते आहे, याबाबत अनेक प्रश्न विचारले गेले. त्यावर ती म्हणाली की हे फोटो शूट म्हणजे फक्त एक गंमत आहे.
मी गरोदर आहे आणि माझ्या आयुष्यात हा जो काय बदल होतो आहे, त्यासाठी मी खूप खुश आहे. आता यापुढच्या आयुष्यात माझ्यासोबत माझी मुलं असणार आहेत. त्यामुळे मुलांशिवाय जे आयुष्य होतं ते आता संपत आलं असून त्या आयुष्याला मी आता निरोप देत आहे...... असा भलताच विचार करून फोटोशूट करणाऱ्या मॅरिडनसमोर मात्र नेटिझन्सनी तर हातच जोडले आहेत.