Join us  

Social Viral : नवरा - नवरी स्टेजवर असताना अचानक एकजण बुरखा घालून आला; अन्  काय घडलं पाहा......

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 12:51 PM

Social Viral : कोणीतरी स्टेजवर जाऊन वराचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्यांसमोर हा प्रकार घडला.  व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच लोकांमध्ये हशा पिकला.

लग्नाच्या दिवशी जेव्हा वधू आणि वर स्टेजवर उभे असतात, तेव्हा भरपूर ओळखीचे लोक त्यांना भेटायला येतात. लग्नात वधू वराच्या मित्र मैत्रिणींनी धमाल-मस्ती केली नाही, तर लग्नात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतात अशा वेळी वराचे मित्र मस्करी करून वातावरण अधिक आनंदी करतात. (Viral Video)असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसला. कोणीतरी स्टेजवर जाऊन वराचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्यांसमोर हा प्रकार घडला.  व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच लोकांमध्ये हशा पिकला. (Groom was standing with the bride on stage a man came in burqa made such joke)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे राहून पाहुण्यांची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाहुणे येताच त्यांच्यासोबत ते फोटो काढायचे आणि भेटवस्तू स्वीकारायचे. काही वेळातच त्याचे काही मित्रही मंचावर आले. वधू-वर ओळखू शकले नसले तरी, मित्राने मंचावर विनोद करण्याची सर्व तयारी केली होती. मित्र बुरखा घालून स्टेजवर आला आणि कोणीही त्याला ओळखू शकले नाही. पण सर्वजण स्टेजवरून खाली उतरू लागताच त्यानं अचानक वराचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

 कितीही आवरलं तरी फ्रीज अस्वच्छ, खराब दिसतो? २० सेकंदात पाहा फ्रीज नीटनेटका ठेवण्याची सोपी ट्रिक

वरानंही अगदी गोंधळून या बुरखा घातलेल्या व्यक्तीपासून स्वत:ला लांब करण्याचा प्रयत्न केला.  वराने त्या व्यक्तीला चुंबन घेऊ दिले नाही. दुसरीकडे हा प्रकार पाहून उपस्थित पाहूणे आश्चर्यचकीत झाले. लग्नाच्या दिवशी वराचे चुंबन घेण्याचा प्रयत्न कोणी केला? असा प्रश्न पाहुण्यांनाही पडला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही समजेल की, वराच्या मित्राने हे कृत्य केले. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ट्यूब इंडिया नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ५५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल