Join us  

ना चीज ना पनीर तरी पदार्थ झाला व्हायरल! ट्विटरवर खाद्यप्रेमींचा दंगा, ‘हे’ घडलंच कसं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2023 9:51 AM

Social Viral Ice Gola Recipe : नेटीझन्सनी पाडला कमेंटसचा पाऊस, काय म्हणाले पाहा...

सोशल मीडियावर हल्ली सतत काही ना काही व्हायरल होत असतं. यामध्ये विविध प्रकारच्या पदार्थांची आणि त्यांच्या प्रयोगांचाही समावेश असतो. बहुतांश पदार्थांमध्ये चीज, पनीर यांसारख्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. यामध्ये चॉकलेट मॅगी, मॅगी सामोसा, चीज पाणीपुरी असे वाट्टेल ते प्रयोग केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत उकाडा असल्याने आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी गारेगार खावेसे वाटते. यामध्ये आईस्क्रीम, गोळा, फालुदा, सरबते अशा गोष्टींचा समावेश असतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि त्यावर कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडला (Social Viral Ice Gola Recipe).

आठवड्याची सुरुवात करताना लक्षात ठेवा ५ डाएट टिप्स, राहाल आठवडाभर फ्रेश आणि हेल्दी...

या रेसिपीमध्ये टरबूजाच्या सालीत बर्फाचा गोळा ही अतिशय इनोव्हेटिव्ह कल्पनाा दाखवण्यात आली आहे. पण लोकांनी त्यावरही खूप चर्चा केल्या आणि अशाप्रकारे एखादा पदार्थ चीजशिवाय कसा असू शकतो असा प्रश्न उपस्थित केला. कुणी त्यावर या पदार्थांचे शहर ओळखा, हे नक्कीच गुजरात असणार असा उपरोधिक टोलाही लगावला. पण प्रत्यक्षात हा व्हिडिओ कुठला आहे ते मात्र अद्याप समजू शकले नाही. २९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हा गोळा कशापद्धतीने तयार केला आहे ते दाखवले आहे.

यामध्ये कलिंगड परफेक्ट अर्धे चिरुन त्याच्या सालीमध्ये हा गोळा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सुरुवातीला बर्फ घालून त्यावर कलिंगडाचा ज्यूस घालण्यात आला. त्यानंतर त्यावर पुन्हा मशिनने बारीक केलेला बर्फ ठेवण्यात आला. यावर चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि मँगो आईस्क्रीमचे ३ गोळे ठेवण्यात आले. त्यावरुन गुलाबी, हिरव्या आणि चॉकलेटी रंगाचे सिरप घालून वरच्या बाजूने क्रिम घालण्यात आले. त्यावर भरपूर टूटी-फ्रूटी आणि ड्रायफ्रूटस पेरण्यात आल्याने हा गोळा दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापाककृतीअन्न