आजकाल जगभरात एका अब्जाधीशाची चर्चा होत आहे, ज्याने आपल्या प्रेयसीसोबत बेडरूममध्ये असताना 10 अब्ज रुपये कमावले आहेत. इंग्लंडच्या या अब्जाधीशाची कहाणी जाणून घेण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक आहे, या व्यक्तीने गर्लफ्रेंडसह बेडरूमध्ये असताना इतके पैसे कसे कमवले. असा प्रश्न सगळयांनाच पडला आहे. (Johnny boufarhat launched video conferencing app and become billionaire)
जॉनी बोफरहाट असे या व्यक्तीचे नाव आहे. वास्तविक, जॉनीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे इतके पैसे कमावले आहेत. जॉनीची इंग्लंडच्या श्रीमंत तरुणांमध्ये गणना होते. 2020 मध्ये संपूर्ण जग कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये होते आणि बहुतेक लोक घरून काम करत होते. हे पाहता जॉनीने हॉपिन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप बनवले.
या अॅपसाठी जॉनीने आधी निधी जमा केला. मग बनवल्याबरोबर भरपूर पैसे कमवला. जॉनी मँचेस्टर विद्यापीठातून पदवीधर आहे. अॅपची कल्पना त्याला 2018 मध्येच सुचली होती, पण त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते. 2018 साली तो त्याच्या प्रेयसीच्या बेडरूममध्ये पडून अॅप कोडिंग करत होता. हे अॅप झूम कॉलसारखे आहे. याद्वारे लाइव्ह व्हिडिओ कॉल करता येणार आहेत.
५० लाखांपेक्षा जास्त लोक वापरत आहेत अॅप
लॉन्च झाल्यापासून एका वर्षातच 50 लाखांहून अधिक लोकांनी याचा वापर सुरू केला आहे. या अॅपचे मूल्य 4 खर्व 12 अब्ज 46 कोटी 79 लाख 57 हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. हे अॅप तयार केल्यानंतर जॉनीची श्रीमंतांच्या यादीत 113 व्या क्रमांकावर गणना झाली. जॉनीने आता या कंपनीचे स्टॉक विकून 10 अब्ज रुपये कमावले आहेत.