दररोज अनेक फोटो, व्हिडिओ आणि संदेश सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हायरल फोटो, व्हिडीओ आणि मेसेजमध्ये अनेक धक्कादायक दावेही केले जातात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्यासोबत एक धक्कादायक दावाही केला जात आहे.
काय आहे या व्हायरल फोटोत?
सोशल मीडियावर वृत्तपत्रातील बातमीच्या रूपात व्हायरल फोटो फिरत आहे. वर्तमानपत्रातील बातमीच्या मथळ्यामध्ये जाड काळ्या अक्षरात लिहिले आहे की पाठवणीच्यावेळी नवरीनं कसं रडायचं हे शिकवलं जाईल. मध्यभागी वधूचे रडणारे चित्र आहे, ज्यावर लिहिले आहे की 7 दिवसात पाठवणीच्यावेळी कसे रडायचं ते शिका.
व्हायरल फोटोसह काय लिहिलं आहे?
वधूच्या पाठवणीच्या वेळी रडण्याचा योग्य अभिनय शिकवण्यासाठी क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. वधू आणि तिचे मित्र या एका आठवड्याच्या क्रॅश कोर्समध्ये भाग घेऊ शकतात. पाठवणीसारख्या संवेदनशील क्षणांना हास्यास्पद होण्यापासून वाचवणे हा त्याचा हेतू आहे. हा अभ्यासक्रम भोपाळच्या राधा राणीने सुरू केला आहे.
व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की राधा राणीने वृत्तपत्राशी बोलताना क्रॅश कोर्स सुरू करण्याचे कारणही दिले. राधा राणीने सांगितले की ती एका लग्नाला गेली होती. विदाईच्या वेळी जिथे वधूचे मित्र काळजीत होते की आता कसे रडावे. प्रत्येकजण एकमेकांना सांगत राहिला की तुम्ही सुरू करा, मग आम्ही रडू लागू. कोणीही रडणार नव्हते. एक मित्र रडू लागला पण त्यानं इतकी भयंकर ओव्हरएक्टिंग केली की वधू रडण्याऐवजी हसू लागली. राधा राणीला येथून असा कोर्स सुरू करण्याची कल्पना मिळाली.
व्हायरल दाव्यामागचं सत्य
समोर आलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी वधूला पाठवणीच्यावेळी रडण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशी कोणतीही संस्था भोपाळमध्ये उघडण्यात आलेली नाही. भोपाळच्या स्थानिक माध्यमांनीही या प्रकारचा कोणताही क्रॅश कोर्स सुरू नसल्याचं सांगितले आहे. पलपल इंडिया वेबसाइटवर ही बातमी पहिल्यांच प्रकाशित झाली होती. या माहितीच्या तळाशी लिहिले होते की, ही बातमी काल्पनिक आहे, त्याचा हेतू केवळ निखळ मनोरंजनाचा आहे. कोणाचीही बदनामी करणे नाही.