Join us  

Social Viral : कमाल! फक्त १७ महिन्यात 'ती' नं ३ कोटीचं कर्ज फेडलं; महिलेची 'पैसे वाचवण्याची सुपर टेक्निक'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 6:06 PM

Social Viral :हजारो, लाखो रूपये नाही तर तब्बल ३ कोटींचं कर्ज या  जोडप्यानं फक्त १७ महिन्यात चुकवलं आहे. यांनी हे कर्ज चुकवण्यासाठी नक्की केलं तरी काय?  हे सगळ्यानाच जाणून घ्यायचं आहे.

ठळक मुद्देफर्निचर पासून जेवणापर्यंत अनेक गोष्टींसाठी त्यांना तडजोड करावी लागली. शॅननच्या कुटुंबात जवळपास ५ जण आहेत.  बाहेर जेवणासाठी जाणं  पूर्णपणे बंद केल्यानं तो खर्च वाचला. शॅननच्या  दाव्यानुसार जीवनशैलीत बदल करण्यासाठी जवळपास ७ महिने लागले.  

सध्याच्या काळात सगळे खर्च सांभाळून बचत करणं खूप कठीण होतं. त्यातल्या त्यात घर, कार किंवा इतर कारणांसाठी कर्ज घेतलं असेल तर हप्ते भरण्यातच बरेच पैसे संपतात. त्यामुळे पैसे वाचवण्याची इच्छा असूनही पैसे वाचवता येत नाहीत. पण एका जोडप्यानं आपल्या जीवनशैलीत कठीण  बदल करून घेतलेलं कर्ज चुकवण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे हजारो, लाखो रूपये नाही तर तब्बल ३ कोटींचं कर्ज या  जोडप्यानं फक्त १७ महिन्यात चुकवलं आहे. यांनी हे कर्ज चुकवण्यासाठी नक्की केलं तरी काय?  हे सगळ्यानाच जाणून घ्यायचं आहे.

द सन यूकेच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील रहिवासी शॅनन आणि तिचा पती  हे दोघं आपलं कर्ज फेडण्याच्या मार्गावर आहेत. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी आपले बरेच खर्च कमी  केले. फर्निचर पासून जेवणापर्यंत अनेक गोष्टींसाठी त्यांना तडजोड करावी लागली. शॅननच्या कुटुंबात जवळपास ५ जण आहेत.  

हे सगळेजण आपापल्या खर्चात कपात करून  हे कर्ज फेडण्यासाठी तिची मदत करत आहेत. ते आपल्या टिकटॉक अकाऊंटवर याचे व्हिडीओ  अपलोड  करत आहेत. या व्हिडीओंना लोकांनी खूप पसंती दिली आहे. या जोडप्यानं आतापर्यंत ४ कोटी ६६ लाखांचे कर्ज फेडलं असून आता १ कोटी ३२ लाख रूपये बाकी आहेत. हे पैसे त्यांनी फक्त १७ महिन्यात परत केले आहेत. 

एका व्हिडीओमध्ये शॅननने खुलासा केला की, ''आम्ही  किराण्याचा खर्च  प्रत्येक आठवड्याचा कसा कमी करता येईल याचा विचार करतो. याशिवाय इलेक्ट्रोनिक वस्तू विकत घेण्यासाठी मोठ्या सेलची वाट पाहतो. '' या जोडप्यानं आपलं आधीचं ३००० स्क्वेअर फूटचं घर सोडून १००० स्क्वेअर फूटच्या घरात राहायला सुरूवात केली. यामुळे ८६, ४०५  रूपयांची बचत झाली. पैसे मिळवण्यासाठी नवीन कार विकून जुनी विकत घेतली. यामुळे ५७ हजारांपेक्षा जास्त रूपयांची दर महिन्याला बचत झाली. 

बाहेर जेवणासाठी जाणं  पूर्णपणे बंद केल्यानं तो खर्च वाचला. शॅननच्या  दाव्यानुसार जीवनशैलीत बदल करण्यासाठी जवळपास ७ महिने लागले.  अशाप्रकारे  फक्त २ वर्षात कुटुंबानं आपलं ३ तृतीयांश  कर्ज फेडलं. आता हे  कुटुंब इतरांना कर्ज फेडण्यास मदत व्हावी म्हणून ऑनलाईन टिप्स  देत आहे. शॅनन चार्ट तयार करून आपल्या खर्चाचा हिशोब करते. त्यात लाईटबील, पाणी बील, भाज्यांचा खर्च, मोबाईल रिजार्च यांचा समावेश असतो.  

टॅग्स :पैसासोशल व्हायरलअमेरिका