Join us  

Social Viral : ५ वर्षांपासून वर्जिन गर्लंफ्रेंड शोधत होता; अटी ऐकूनच घाबरायच्या मुली, अन् आता घडलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 1:41 PM

Social Viral : अटी शर्तींवर नात टिकवणं तर सोडूनच द्या पण आजकाल अटींनुसार जोडीदार मिळणंही कठीण झालंय.

आपल्याला हवा तसा जोडीदार मिळावा असं प्रत्येक सिंगल व्यक्तीला वाटतं. प्रत्येकाच्या आपल्या होणाऱ्या पार्टनरकडून अपेक्षा असतात. ४१ वर्षांच्या डेनियल पायचनिकने गर्लफ्रेंड शोधण्यासाठी एक आगळी वेगळी  जाहिरात काढली. (एडिलेड) ऑस्ट्रेलियात राहणारा एक व्यक्ती  बोर्ड गेमिंग डिजायनर आहे आणि तो स्वत:साठी  स्वत:प्रमाणेच बुद्धीमान असलेल्या मुलीचा शोध  घेत आहे. अटी शर्तींवर नात टिकवणं तर सोडूनच द्या पण आजकाल अटींनुसार जोडीदार मिळणंही कठीण झालंय. अशा या जाहिरातीची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगलीये.

डेनिअलनं सुरूवातीपासूनच आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. तो एक वर्कोहॉलिक माणूस आहे. सुरूवातीपासूच  त्याला अशा मुलीचा शोध आहे जिची वर्किंग स्टाईल मॅच करत असेल.  यासाठी या माणसानं २०१६ मध्ये   वेबसाईट singleguyfromadelaide.com वर एक जाहिरात टाकली होती त्यात काही अटी  होत्या.

या जाहिरातीतील अटी काय आहेत?

डॅनियलनं या जाहिरातीत लिहिलं होतं की, मी डेनियल आहे. थोडा अजब आहे पण मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे. ज्याला  शोधणं खूपच कठीण आहे.  मला अशी मुलगी हवीये तिचा कधीच कोणी पार्टनर नव्हता आणि तिचे शरीरसंबंध झालेले नसावेत. डेनियनलं यावेळी हेसुद्धा नमुद केलं की मला रिलेशनशिपमध्ये येण्याची काहीही घाई नाही. सुरूवातीला आम्ही मित्र म्हणून राहू शकतो. 

ही जाहिरात टाकून आज ५ वर्ष झाले पण यातील अटी पूर्ण होतील अशी एकही मुलगी आतापर्यंत डॅनियलला मिळालेली नाही. आपल्या अटींमुळे डॅनियल संपूर्ण जगभरात चर्चेत आला आहे. लोक त्यांच्या या  चित्र विचित्र मागणीवर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं त्याला म्हटलं की, इतके शब्द लिहायची काय गरज होती. सरळ सांगायचं ना तुला वर्जिन मुलगी हवीये म्हणून.'

अजून एका युजरनं बेस्ट ऑफ लक डेनियल, तुम्ही खरंच एक  चांगला माणूस आहात. तुम्हाला परफेक्ट पार्टनर मिळेल. असं म्हटलंय. डेनियलच्या या जाहिरातीत स्वारस्य असलेले लोक टेलिग्राम किंवा स्काईपच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधू शकतात. 

टॅग्स :सोशल व्हायरल