Join us  

Social Viral : बाबौ! एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन निघाले; बसलेल्यांची संख्या मोजताना तुम्हालाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 8:50 PM

Social Viral : व्हिडिओमध्ये अनेक लोक स्कूटीवर बसलेले दिसत आहेत. या स्कूटीमध्ये इतके लोक बसले आहेत, ज्यांना मोजणे कठीण जात आहे.

दुचाकीवर दोनपेक्षा जास्त लोक बसल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. तर वाहतूक नियमानुसार दुचाकीवर दोनपेक्षा जास्त लोक बसू शकत नाहीत. याशिवाय दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. असे असतानाही वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्यात अनेकजण मागे नाहीत, त्याच्या जीवाला धोका असला तरी नियम मोडणं सुरूच असतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  (Many person sat in a scooty people confuse in counting 99 percent failed)

व्हिडिओमध्ये अनेकजण एकाच स्कूटीवर बसलेले दिसत आहेत. या स्कूटीमध्ये इतके लोक बसले आहेत, ज्यांना मोजणे कठीण जात आहे. हा व्हिडिओ पाहून लोक स्कूटी ड्रायव्हरला 'हेवी ड्रायव्हर' म्हणत आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे स्कूटीमध्ये इतके लोक बसूनही ती व्यक्ती अतिशय वेगाने स्कूटी चालवत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सुमारे अर्धा डझन लोक स्कूटीवर बसलेले दिसत आहेत. मात्र, स्कूटीवर नेमके किती लोक बसले हे कळू शकलेले नाही. स्कूटीवर बसलेल्यांची नेमकी संख्या सांगण्यात सोशल मीडिया युजर्सचाही गोंधळ उडाला आहे. काही लोकांना स्कूटीमध्ये 5 लोक बसलेले दिसतात, तर काहींना 6 लोक दिसतात. स्कूटीमध्ये 7 जण बसल्याचे अनेकजण सांगत आहेत. सध्या 99 टक्के लोक स्कूटीवर बसलेल्यांची नेमकी संख्या सांगण्यात अपयशी ठरले आहेत. 

तोल गेल्यानं अपघाताचा धोका

स्कूटी चालवणारी व्यक्ती अनेक मुलांना गजबजलेल्या रस्त्यावर शाळेत सोडत असल्याचे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्यक्तीने स्कूटीवर अनेक बॅगा पुढे ठेवल्या आहेत. तर मागे पाच मुलांना बसवून ठेवले आहे. बाजूला एक मूल उभं राहिलेलं दिसतंय, तर एक मुलगी अर्ध्या वाटेवर दिसत आहे. थोडासा तोल गेल्याने स्कूटीचा धोकादायक अपघात होऊ शकतो. Himanshutiwari68 नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल