कोविड -१९ ने संपूर्ण जगभरात कहर केला असून आणि लोक अजूनही त्याच्या प्रभावाखाली दबले आहेत. यामुळे लोकांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या नुकसान झाले आणि काही लोकांना अजूनही आघातातून सावरणे कठीण वाटत आहे. या रोगामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी शांत राहणे आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवणं कठीण होतं. कारण मनात वेगवेगळे विचार येत असतात, व्यक्तीला अस्वस्थ, खचल्यासारखं वाटतं.
रुग्णालय ही एक अशी जागा आहे जिथे केवळ शारीरिकच नाही तर रुग्णाचे मानसिक आरोग्य देखील असुरक्षित आहे आणि अशा वेळी सहाय्यक कर्मचारी असणं फार महत्वाचं ठरतं. कारण ते रुग्णाची चिंता आणि भीती समजून घेतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक नर्स कोविड -19 रुग्णाची चिंता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या सर्व गोष्टी हृदयस्पर्शी आहेत.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता एलिसन वॉकर नावाची एक नर्स कोविड -१९ ने ग्रस्त असलेल्या रुग्णाला एक भावपूर्ण गॉस्पेल गाणे गाताना दिसली. या नर्सनं गाणं गायल्यानंतर सगळ्यांमध्ये उत्साह आला. टेक्सासमधील मेथोडिस्ट हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, दहा वर्षांपासून नर्स म्हणून काम करणारी एलिसन रूग्णांच्या आध्यात्मिक आणि मानसिक उपचारांच्या महत्त्वावर विश्वास ठेवते आणि तिच्या गाण्यात तिच्या प्रेमाचा समावेश करते.
बाबौ! दागिन्यांच्या वजनानं चालणंही मुश्किल केलं; तब्बल ६० किलो सोन्यानं सजली नवरी; पाहा फोटो....
टेक्सासमधील मेथोडिस्ट हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, दहा वर्षांपासून नर्स म्हणून काम करणारी एलिसन, तिच्या रूग्णांच्या आध्यात्मिक आणि मानसिक उपचारांच्या महत्त्ववर विश्वास ठेवते आणि ती नेहमी प्रेमपूर्ण गाणी गाऊन रुग्णांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करते. ''रुग्णांसाठी ही भीतीदायक वेळ आहे. आणि म्हणून, कधीकधी मी पूर्ण पीपीई कीट घालून गायन करते. मी रुग्णांना आलिंगन देते किंवा मी त्यांच्याबरोबर प्रार्थना करते, जे काही लागेल ते देण्याचा प्रयत्न करते.'' असं एलिसन म्हणाली.
धक्कादायक! ३० वर्षांपासून ज्यांना स्वत:चे वडील समजत होती ते खरे वडील नव्हतेच; आईचं 'असं' फुटलं भांडं
हॉस्पिटलनं आपल्या इन्स्टाग्रामपेजवर व्हिडीओ अपलोड केल्यापासूनचा व्हिडिओ ४ हजाराहून अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. नेटिझन्स नर्सच्या दयाळूपणाची प्रशंसा करतात आणि तिच्या गायनाला दाद देत आहेत. तिचं गाणं ऐकून एका युजरनं म्हटलंय की, देव तिच्या चांगल्या आत्म्याला आशीर्वाद देवो. याशिवाय या व्हिडीओवर अनेकांनी कौतुकास्पद कमेंट्स वर्षाव केला आहे.