मूल होण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार महिलांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. तर काहीजण पारंपारिक उपायांचा अवलंब करतात. सध्या सोशल मीडियावर गरोदर महिलेची अजबच घटना समोर येत आहे. इंग्लँडमधील रहिवासी असलेल्या महिलेची प्रेग्नंसी चांगली चर्चेत आहे. ३३ वर्षांच्या एका महिलेनं एका ई बाळाला जन्म दिला आहे.
द मिररच्या रिपोर्टनुसार स्टेफनी टेलर नवाच्या महिलेचा घटस्टोफ झाला होता आणि तिला ५ वर्षांचे मूलही होते. पण स्टेफनीला आता दुसरं मुल हवं होतं. पण यासाठी तिला कोणतेही शारीरिक संबंध ठेवायचे नव्हते. म्हणून तिनं ऑनलाईन स्पर्म आणि इनसेमिनेशन किट मागवले. युट्यूबवर हे किट वापरण्याची पद्धत शिकून घेतली आणि यशस्वी प्रेग्नंसीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. तिच्या मैत्रिणीनं तिला एका अॅप्लिकेशनबाबत सांगितले.
शॉर्ट्स घातले म्हणून तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; म्हणाले स्कार्फ गुंडाळून परिक्षेला बस
हे अॅप्लिकेशन टिंडरप्रमाणे काम करतं. यावर तुम्ही आपल्याला हवी असलेली प्रोफाईल निवडू शकता. स्टेफनीनं या ऑनलाईन अॅप्लिकेशनबाबत माहिती मिळवणं सुरू केलं आणि स्पर्म आणि इनसेमिनेशन किट मागवले. ज्या व्यक्तीकडून स्टेफनीला स्पर्म हवे होते तो व्यक्ती स्वत: ते द्यायला तिच्या घरी आला होता.
साडी नेसून आली म्हणून रेस्टॉरंटमधून महिलेला हाकललं; व्हायरल होतोय एंट्री नाकारल्याचा व्हिडीओ
विशेष म्हणजे युट्यूबवरून शिकून ही महिला गरोदर झाली आणि तिची यशस्वीरित्या प्रसृती झाली. स्टेफनी या बाळाला एक चमत्कार मानते. ती या बाळाला 'रिअल ऑनलाईन बेबी' असं म्हणतात. या बाळाचं नाव इडेन असं ठेवलं आहे. स्टेफनीनं सांगितले की, जर भविष्यात कधी तिच्या मुलीला बायोलॉजिकल वडीलांना भेटायचं असेल तर तिला काही आक्षेप असणार नाही. स्टेफनीनं सांगितले की, ''तिचे वडील या मुलीला स्वीकारायला तयार नव्हते. त्यानंतर मीच तिला स्वीकारायचं ठरवलं. माझी बहिण आणि आई दोघेही तिच्या जन्मानंतर खूप आनंदी आहेत.'' आता हेच बाकी होतं! ऑनलाईन क्लासमध्ये डमी ठेवून खुशाल झोपली; तुफान व्हायरल होतेय ट्रिक