Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही...

Social Viral : पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही...

Social Viral : ही अजब घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ८ महिन्यांपर्यंत या महिलेला आपल्या गर्भवती असण्याबाबत कल्पना नव्हती याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:58 PM2021-09-24T15:58:28+5:302021-09-24T16:04:24+5:30

Social Viral : ही अजब घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ८ महिन्यांपर्यंत या महिलेला आपल्या गर्भवती असण्याबाबत कल्पना नव्हती याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. 

Social Viral : Severe indigestion pregnancy diagnosis medication woman surprised | Social Viral : पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही...

Social Viral : पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही...

युकेच्या रिवोनी एडम्स नावाच्या महिलेला नेहमीच गॅस झाल्यानं पोटदुखीची समस्या उद्भवायची.  मागच्या तीन वर्षांपासून ही महिला पचनाशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी औषधं घेत होती. एकदा चेकअपदरम्यान डॉक्टरांनी सांगितलं की, ती ८ महिन्यांची गर्भवती असून कोणत्याही क्षणी प्रसुती होऊ शकते. ही अजब घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ८ महिन्यांपर्यंत या महिलेला आपल्या गर्भवती असण्याबाबत कल्पना नव्हती याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. 

द सनच्या रिपोर्टनुसार २२ वर्षीय रिवोनीला नेहमीच पोटदुखीचा त्रास जाणवायचा. मागच्या तीन वर्षांपासून ती पचनाच्या गोळ्या घेत होती. रिवोनीनं सांगितले की, ''मी जेव्हा तिखट अन्नपदार्थ आणि कार्बोनेट ड्रिंक्स पिते तेव्हा मला उलट्या, पोटाला सूज येणं,  तीव्र वेदना होणं असा त्रास जाणवतो. मला भूकसुद्धा लाागत नाही. सतत हा त्रास वाढल्यानतर मी डॉक्टरकडून औषधं बदलून घेण्याचं ठरवलं.

पण यावेळी डॉक्टरांनी जे सांगितले ऐकून मी आश्चर्यचकीत झाले. मी मला जाणवत असलेल्या लक्षणांबद्दल सांगताच डॉक्टर म्हणाले मी गरोदर आहे. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलं मी ८ महिन्यांची गरोदर आहे आणि माझी प्रसृती कोणत्याहीवेळी होऊ शकते. हे ऐकताच मी डॉक्टरवर संतापले कारण मला बाकीची काहीच लक्षणं दिसली नव्हती ज्यावरून मी गरोदर आहे असं म्हणता येईल.'' 

मूल होण्यासाठी तिनं ऑनलाईन शुक्राणू मागवले अन् गरोदर झाली; मग घडलं असं काही...

रिवोनी आणि तिचा फिटनेस फ्रिक पार्टनर तासनतास जीममध्ये घाम गाळतात. तिनं पुढे सांगितलं की, ''डॉक्टरांच्या बोलण्यावर मला विश्वासच होत नव्हता कारण माझे पिरिएड्स वेळेवर येत होते.  माझे एब्स व्यवस्थित दिसत होते. याशिवाय मला थकवासुद्धा वाटत नव्हता.  ना माझं वजन वाढलं, ना पोट बाहेर आलं. म्हणून मी डॉक्टरांशी वाद घातला. त्यावेळी माझा जोडीदार शांतपणे उभा होता. ''

 शॉर्ट्स घातले म्हणून तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; म्हणाले स्कार्फ गुंडाळून परिक्षेला बस

रिवोनीच्या म्हणण्यानुसार ती आणि तिचा पार्टनर बाळाला जन्म देण्यासाठी तयार नव्हते. करियर, आरोग्य आणि आर्थिकदृष्या नवीन जबाबदारी स्विकारण्यास तयार सध्या नव्हते. त्यांना त्यांच्या नात्यासाठी काहीवेळ द्यायचा होता. पण आता बाळाची चाहूल लागल्यानं हे दोघेही खूप खूश आहेत. ''कधी एकदा बाळाला हातात घेतेय असं झालंय.". असंही रिवोनी म्हणाली. 

Web Title: Social Viral : Severe indigestion pregnancy diagnosis medication woman surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.