Join us  

शालेय विद्यार्थ्याने सुट्टीच्या अर्जात शिक्षकांना लिहीले असे काही, वाचून तुम्हीही खूप हसाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2022 1:59 PM

Social Viral Student Application in Bundelkhand Language will Make You Laugh : हे पत्र वाचून तुम्हाला हसू नाही आले तरच नवल.

ठळक मुद्देअनेकांनी यावर एकाहून एक प्रतिक्रिया दिल्या असून या मुलाच्या थेट बोलण्याचे कौतुक होत आहे. सुट्टीचा अर्ज लिहीण्याची या लहानग्या मुलाची पद्धत फारच बेधडक असल्याचे यातून दिसते.

शाळेत सुट्टी घ्यायची असेल की शिक्षकांना एक पत्र द्यावे लागते. लहानपणी आपण सगळ्यांनीच असे पत्र कधी ना कधी नक्की लिहीले असेल. यामध्ये कधी आपल्याला बरे नसल्याने तर कधी गावाला जायचे असल्याने, कधी घरात काही कार्यक्रम असल्याचे कारण आपण लिहीले असेल. आता असेच एका विद्यार्थ्याने शिक्षकांना लिहीलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्याने लिहीलेल्या गोष्टीमुळे त्याबाबत बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. हे पत्र वाचून तुम्हाला हसू नाही आले तरच नवल. हे पत्र आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली असून यामध्ये विद्यार्थ्याने नेमके काय लिहीले ते पाहूया (Social Viral Student Application in Bundelkhand Language will Make You Laugh)...

बुंदेलखंडी भाषेत या मुलाने हा सुट्टीचा अर्ज लिहीला आहे. एकदम देसी स्टाईलमध्ये या मुलाने अर्ज लिहीला असून आपली समस्या शिक्षकांसमोर मांडली आहे. तो लिहीतो, ‘ मला २ दिवसांपासून ताप येत आहे, त्याशिवाय माझे नाकही गळत आहे ते वेगळेच. यामुळे मी शाळेत येऊ शकत नसल्याने माझी दोन-चार दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात यावी, असे केल्यास खूप चांगले होईल.’ आता इथपर्यंत ठिक आहे. पण यातले शेवटचे वाक्य सगळ्यात हास्यास्पद आहे. ‘तसंही मी आलो नाही तर थोडीच तुमची शाळा बंद पडणार आहे.’ शेवटी तो लिहीतो ‘तुमचा आज्ञाधारी शिष्य, कलुआ.’

सुट्टीसाठीचा अर्ज असे म्हणून शेअर करण्यात आलेले हे पत्र ट्विटरवर चांगलेच व्हायरल होत आहे. एप्रिलमध्ये पोस्ट करण्यात आलेल्या या पत्राला आतापर्यंत १० हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत तर १४०० हून अधिक जणांनी हे पत्र रिट्विट केले आहे. अनेकांनी यावर एकाहून एक प्रतिक्रिया दिल्या असून या मुलाच्या थेट बोलण्याचे कौतुक होत आहे. इतकेच नाही तर बुंदेलकखंडची भाषा कशी आहे याबाबतही अनेकांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलविद्यार्थीशिक्षकव्हायरल फोटोज्