सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे खाद्यप्रयोग व्हायरल होत असतात. आता एक आगळं वेगळं चॅलेन्ज व्हायरल होताना दिसून येतंय. दिल्लीच्या उत्तम नगरमधील एका विक्रेत्यानं सर्व खाद्यप्रेमींना एक चॅलेन्ज दिलं आहे. यानुसार 10 फूट लांबीचा मसाला डोसा पूर्ण खाऊ शकणार्या प्रत्येत व्यक्तीला तब्बल ७१ हजार रूपये मिळणार आहेत. ते ही कोणत्याही प्रकारचे प्रश्न उत्तर न करता. (This delhi eatery will give you rs 71k if you finish their 10 foot long dosa)
फूड ब्लॉगर भावना यांनी उत्तम नगरमधील स्वामी शक्ती सागर नावाच्या आऊटलेटमध्ये डोसा विक्रेत्याला भेट दिली ज्याने हे नवीन आव्हान सादर केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 10 फूट लांबीचा डोसा कसा बनवला जातो हे दाखवण्यात आले आहे. व्हायरल व्हिडिओला ५० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Viral Video of 10 foot long dosa)
व्हायरल व्हिडीओमध्ये १० फूट लांब डोसा कसा तयार केला जातो हे तुम्ही पाहू शकता. यात सांभार, चटणी आणि बटाट्याची भाजी हे पदार्थांचा समावेश आहे. या इंस्टाग्राम पोस्टवर फूड ब्लॉगरनं पत्तासुद्धा दिला आहे. नेटिझन्सनी या व्हिडीओ पोस्टवर कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत. 'येह तो चुटकी मे खतम कर देंगे', अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे.