Join us  

जगातली सगळ्यात मोठी स्ट्रॉबेरी! गिनिज बुकमधे झाली नोंद, वजन पाहाल तर....?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 1:15 PM

Largest strawberry of the world: एखाद्या छोट्या खरबुजाच्या आकाराची स्ट्रॉबेरी (fruit) बघितली आहे का? ही बघा, ही आहे जगातली सगळ्यात मोठी स्ट्रॉबेरी.. बघा या स्ट्रॉबेरीचं वजन तरी किती..

ठळक मुद्देयापुर्वी जगातल्या सगळ्यात मोठ्या स्ट्रॉबेरीचा रेकॉर्ड जपानमध्ये उत्पादित झालेल्या स्ट्रॉबेरीच्या नावाने होता.

स्ट्रॉबेरी म्हणजे आपल्याकडे अजूनही असं एक फळ आहे, ज्याच्याकडे खूप उत्सूकतेनं पाहिलं जातं.. केळी, चिकू, सफरचंद किंवा हंगामी असलं तरी द्राक्षे, टरबूज या फळांना अगदी सहज घेतलं जातं. पण स्ट्रॉबेरीचं (world's largest and heaviest strawberry) मात्र अजूनही आपल्याकडे भरपूर कौतूक होतं. एकतर खूप कमी काळ ती आपल्याला खायला मिळते आणि दुसरं म्हणजे अजूनही मर्यादित भागातच तिचं उत्पादन होत असल्याने ती अनेक प्रदेशातल्या लोकांसाठी कधीतरीच मिळणारं फळं आहे.. त्यामुळे तिच्याबाबतचं आकर्षण कायम असतं.. 

 

सध्या आपल्याकडे स्ट्रॉबेरीचा हंगाम आहे. बाजारात विकायला येणाऱ्या स्ट्रॉबेरी या साधारण लिंबाच्या आकाराच्या किंवा त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या. पण इस्त्रायलच्या (Israeli strawberry) या स्ट्रॉबेरीने मात्र कमालच केली आहे. हळूहळू ती लिंबाएवढी झाली, तिचा आकार आणखी थोडा वाढला आणि ती टोमॅटोएवढी झाली... इथवरच न थांबता या स्ट्रॉबेरीने तिचा आकार आणखी फुलविला आणि ती चक्क एखाद्या छोट्या खरबुजाएवढी झाली आहे..

 

या स्ट्रॉबेरीचा आकार एवढा मोठा आहे की गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही ( guinness book of world record) तिची नोंद घेतली आहे. ही स्ट्रॉबेरी आता जगातली सगळ्यात मोठी स्ट्रॉबेरी म्हणून ओळखली जात आहे. इस्त्रायलच्या कदीमा जोरान परिसरातील एरियल कुटूंबाने त्यांच्या शेतात या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं आहे. एरवी आपण ज्या स्ट्रॉबेरी पाहतो त्याचं वजन जवळपास २५ ग्रॅमपर्यंत असतं. पण या स्ट्राॅबेरीचं वजन तब्बल २८९ ग्रॅम आहे. ही स्ट्रॉबेरी १८ सेमी लांब असून ४ सेमी जाड आहे.

 

यापुर्वी जगातल्या सगळ्यात मोठ्या स्ट्रॉबेरीचा रेकॉर्ड जपानमध्ये उत्पादित झालेल्या स्ट्रॉबेरीच्या नावाने होता. २०१५ साली नोंद झालेल्या या स्ट्रॉबेरीचे वजन जवळपास २५० ग्रॅम होते. ही स्ट्रॉबेरी अमाऊ या जातीची होती. जपानचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आता इस्त्रायल स्ट्रॉबेरीने मोडला आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियागिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डइस्रायलफळे