Join us  

Social Viral : वाह! जुन्या बरण्या वापरण्याचा महिलेचा देशी जुगाड; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 4:47 PM

Social Viral : व्हिडिओमध्ये अर्शिया तिचे रेफ्रिजरेटर उघडताना आणि आले पेस्ट लेबल असलेली बरणी काढताना दिसत आहे.

सर्वच भारतीय घरांमध्ये बाहेरून विकत आणलेल्या एखाद्या वस्तूची बरणी किंवा डबा रिकामा झाला की त्याचा वापर इतर वस्तू  ठेवण्यासाठी केला जातो.  मसाले, डाळी, ड्रायफ्रुट्स असे रोजच्या वापरातले कोणतेही पदार्थ  ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर भारतीय अमेरिकन महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  (woman’s desi hack of storing stuff in used jars will make you laugh. Viral video)

अर्शिया मूरजानीने इंस्टाग्रामवर देसी जुगाडाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि नेटिझन्स त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहेत. व्हिडिओमध्ये अर्शिया तिचे रेफ्रिजरेटर उघडताना आणि आले पेस्ट लेबल असलेली बरणी काढताना दिसत आहे. पण, बरणीत डोसा पिठात असल्याचं कळतं! हे पाहिल्यानंतर सगळ्याच गृहिणींना नवल वाटायला नको.

22,000 हून अधिक लाईक्स आणि अनेक प्रतिक्रियांसह व्हिडिओ व्हायरल झाला आहेत. तर इतरांनी व्हिडिओवर हसणारे इमोजी शेअर केले आहेत. 'तुम्ही भारतीय आहात हे न सांगता भारतीय असल्याचं सांगा.'  असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. 

''माझे कुटुंब सर्वकाही रिसायकल करते. ही आल्याची पेस्ट नाही तर त्यात ठेवलेले सर्वोत्तम डोसा पिठ आहे. जे माझ्या बहिणीने काही दिवसांपूर्वी आमच्या फ्रीजमध्ये ठेवले होते.  आधी मी खूप गोंधळेले, पण माझ्या कुटुंबाचा मला अभिमान वाटतो. ते नेहमी कोणत्याही गोष्टीचा पुनर्वापर करण्याचे मार्ग शोधतील! असं कॅप्शन अर्शियानं इंस्टा पोस्टला  दिलंय.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलअन्न