Join us

सोशल मीडियावर #ThisLittleGirlIsMe चा ट्रेंड भारी; बालपणीचा फोटो टाकून स्त्रिया सांगताहेत भन्नाट स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 20:03 IST

Social Viral : #ThisLittleGirlIsMe बालपणीच्या फोटोंनी सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ठळक मुद्देआता फेसबुकवर #ThisLittleGirlIsMe असा ट्रेंड व्हायरल होत आहे. या अंतर्गत महिला आपला लहानपणीचा फोटो शेअर करून आपली सक्सेस स्टोरी लोकांना सांगत आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेंड्स व्हायरल होत असतात. या ट्रेंड्सनुसार लोक वेगवेगळे फोटो अपलोड करून लक्ष वेधून घेतात. काही दिवसांपूर्वी नथीचा नखरा ट्रेंड व्हायरल झाला होता. त्यावेळी सगळ्या बायकांनी आपआपले नथ घालून फोटो शेअर केले होते.

त्यानंतर कपल चेलेंज फेसबूकवर खूप  गाजत होतं, तेव्हा लोकांनी आपापल्या जोडीदारासोबतचे फोटो महिलांसह पुरूषांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान आपली खासगी माहिती, फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यास सायबर गुन्ह्यांना आमंत्रण मिळू शकतं असा इशाराही पोलिसांनी दिला होता. 

आता फेसबुकवर #ThisLittleGirlIsMe असा ट्रेंड व्हायरल होत आहे. या अंतर्गत महिला आपला लहानपणीचा फोटो शेअर करून आपली सक्सेस स्टोरी लोकांना सांगत आहेत. निकोल सेह या तरूणीनं आपला लहानपणीचा फोटो शेअर करत सांगितले की, 'मी एक शांत मुलगी होते इतर मुलांना आधीच माहित होते की त्यांना काय हवे आहे आणि ते क्रीडा, शैक्षणिक गोष्टीत उत्कृष्ट होते. 

मी चांगल्या शाळांमध्ये गेले, पण वर्गात कधीच पहिली आले नाही. खरं तर मी कबूल करते की मी एक साधारण विद्यार्थी होते. मी हवा तसा चांगला अभ्यास केला नाही याची आजही मला खंत आहे.' बालपणीच्या फोटोंनी सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. निकोलच्या या फेसबुक पोस्टला आतापर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून १४० पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

शिरीना शॉफनंही सोशल मीडियावर या ट्रेंडला अनुसरून आपला आताचा आणि बालपणीचा फोटो शेअर करत आपली सक्सेस स्टोरी सांगितली आहे. वयाच्या सातव्या वर्षाचा हा फोटो असून ती तेव्हा जपानमध्ये होती असं तिनं सांगितलं.

कुटुंब, मित्र मैत्रिणींच्या सहवासात माझं बालपण गेलं, तेव्हा माझ्यात इतका आत्मविश्वास नव्हता. असं तिनं पोस्टच्या सुरूवातील लिहिलं आहे. तुम्हीसुद्धा या ट्रेंडचा भाग बनत आपले बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सक्सेस स्टोरी सांगू शकता. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल