Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : माणुसकी नसलेली आभासी लोकं; सोशल मीडियातील 'या' व्हायरल फोटोनं बघणाऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी

Social Viral : माणुसकी नसलेली आभासी लोकं; सोशल मीडियातील 'या' व्हायरल फोटोनं बघणाऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी

Social Viral : एका हतबल आईचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाला. लोकांनी या व्हिडीओवर संतापजनक कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 02:22 PM2021-10-31T14:22:27+5:302021-11-01T11:47:56+5:30

Social Viral : एका हतबल आईचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाला. लोकांनी या व्हिडीओवर संतापजनक कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहे. 

Social Viral : Video of mother and child goes viral | Social Viral : माणुसकी नसलेली आभासी लोकं; सोशल मीडियातील 'या' व्हायरल फोटोनं बघणाऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी

Social Viral : माणुसकी नसलेली आभासी लोकं; सोशल मीडियातील 'या' व्हायरल फोटोनं बघणाऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला खळखळून हसवतात तर काही दृश्य विचार करायला प्रवृत्त करतात.  गेल्या काही दिवसांपासून डोळ्यात पाणी आणणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका हतबल आईचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाला. लोकांनी या व्हिडीओवर संतापजनक कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मेट्रो ट्रेनच्या महिला डब्यात सर्व महिला सीटवर बसल्या आहेत. यावेळी प्रत्येकीचं लक्ष आपापल्या मोबाईलमध्ये आहे. त्याचवेळी एक साडीतील महिला आपल्या छोट्याश्या लेकराला घेऊन बसली आहे. 'शिक्षणानं सर्वकाही मिळवलं असं नाही, त्याला थोडी माणूसकीची जोड हवी.' असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

या व्हिडीओवर पुरूषांनी संतापजनक कमेंट्स केल्या असून काहींनी आपले स्वत:चे अनुभव शेअर केले आहेत. 'स्त्रीच स्त्रीच्या बाबतीत कशी असंवेदनशील असते याच एक जिवंत उदाहरण.' अशी कमेंट एका युजरनं केलीये. तर एकानं 'यांच मुळ कारण मोबाईल फोनच वाटतंय. ऊभे राहून फोन हाताळणे कठीण होईल म्हणून कोणी सीट देत नसावे.' असं म्हटलंय.

 लय भारी! पठ्ठ्याच्या टिकली अन् साडीच्या फॅशननं नेटीझन्सना लावलं वेड; पाहा बाईलाही लाजवेल असा हटके लूक

याऊलट सीटवर बसलेल्या स्त्रियांच्या समर्थनार्थही काही कमेंट्स पाहायला मिळत आहे. 'खुर्चीवर बसलेल्या बाईची काही वेगळी कैफियत असू शकते. कदाचित तिला झोप लागल्यावर ती बाळ असलेली बाई चढली असेल मेट्रोत, कदाचित खुर्चीवरच्या स्त्रीला पाळीमुळे असह्य त्रास होत असेल जो चेहऱ्यावर दिसता कामा नये असे संस्कृती सांगते त्यामुळे दिसत नसेल.. कदाचित अजून काही..  कदाचित हा फोटो काढल्यावर ती जागी होऊन तिने त्या दुसरीला जागा दिली असेल.. एक क्षणावरून त्या खुर्चीवरच्या बाईची डिग्री कुचकामी वगैरे म्हणणे काही पचत नाही.' अशी कमेंट एका महिलेनं या व्हिडीओवर केली आहे. 

प्रसिद्ध लेखक हेरंब कुलकर्णी यांनीही हा फोटो पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.  'मोबाईल आल्याने  पत्रकारिता ही सार्वत्रिक होते आहे.पत्रकार असणे ही वृत्ती असते. जे जे खटकेल ते ते व्यक्त करावे.  व्यवस्था सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे पत्रकार असण्याचे लक्षण असते.....आज हा फोटो बघितल्यावर त्या व्यक्तीची ही वृत्ती भावली...कोणताच समूह हा एकसंघ नसतो तर त्या समूहाच्या आत अनेक स्तर असतात,वर्ग तयार होतात...भारत व इंडिया तयार होतात  इतका मोठा आशय आज या एका फोटोने तयार झाला.

फक्त ब्रा घालून मॉडेल करतेय मंगळसुत्राची जाहिरात; सब्यसाचीच्या 'त्या' जाहिरातीवर नेटकरी संतापले

फार पूर्वी एखादी महिला जर एस टी त उभी दिसली की लगेच पुरुष उभे राहत व महिलांना जागा देत ..तिथपासून  आपण कुठे येऊन थांबलो....?? सेल्फीपेक्षा आज कॅमेरा चा असा उपयोग वाढायला हवा त्यातून सामाजिक मुद्दे पुढे येऊन दबाव निर्माण होत राहील...' असं कॅप्शन देत त्यांनी या महिलेचा फोटो शेअर केला आहे. 
 

Web Title: Social Viral : Video of mother and child goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.