आजकाल एखादा पदार्थ करताना त्यात खूपच अतरंगी प्रकार, प्रयोग करण्याचं फॅड प्रचंड वाढलंय.. कशातही काहीही टाकायचं आणि तो पदार्थ खवय्यांना चाखायला द्यायचा, असा हा प्रकार.. एखाद्या पदार्थाची चव आणखी खुलविण्यासाठी त्यात काही तरी स्पेशल टाकायचं, हे आपण समजू शकतो... पण एखादा हटके पदार्थ करायचा म्हणून काय चक्क गरमागरम चटकदार वडापावाला असं आईस्क्रिममध्ये (vadapav with ice cream) घोळवायचं... हे म्हणजे जरा अति झालंय.. अशी प्रतिक्रिया या व्हिडिओला येत असून नेटकरी या माणसावर चांगलेच रागावले आहेत..
weird food combinations हा ट्रेण्ड सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे.. वडापाव आईस्क्रिम हा पदार्थही त्याच रांगेतला. thegreatindianfoodie या इन्स्टाग्राम पेजवर (instagram video) हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. valentines day special vadapav ice cream roll असं या पदार्थाचं नाव असून तो खास व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवसासाठी बनविण्यात आला होता म्हणे.. दिल्ली येथील अमर कॉलनी या परिसरातील एका वडापाव विक्रेत्याकडे हा अजब गजब प्रकारचा वडापाव आईस्क्रिम रोल मिळतो...
हा रोल बनविताना सगळ्यात आधी त्या विक्रेत्याने एक वडापाव घेतला. तो आईस्क्रिमसाठी असणाऱ्या कोल्ड पॅनवर ठेवला. या वडापावचे छोटे छोटे तुकडे केले. त्यावर मग त्याने आईस्क्रिम टाकलं. आईस्क्रिम आणि वडापाव यांना एकत्रित स्मॅश करून चांगलं एकजीव करून घेतलं. त्यानंतर हे मिश्रण त्याने त्या तव्यावर डोसा पसरावा तसं पसरवून घेतलं. नंतर या मिश्रणाचे रोल केले. अशाप्रकारे तयार झालेले हे वडापाव आईस्क्रिम रोल एका सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवले. त्यावर पुन्हा आणखी एक वडापाव ठेवला. त्यावर छान झणझणीत हिवी मिरची ठेवली... आता अशी प्लेट हातात आल्यावर वडापाव आणि मिरचीचा आस्वाद घ्यायचा की तो वडापाव आईस्क्रिम रोल खायचा, की दोन्ही एकत्र करून खायचं हा प्रश्न खाणाऱ्याला नक्कीच पडला असणार..