एका स्पॅनिश सोशल मीडिया इन्फ्लुएंजरनं उघड केले की तब्येत सुधारण्यासाठी ती मासिक पाळीच्या दिवसात स्वत:चं रक्त पिते. तिच्या म्हणण्यानुसार तुमचे मासिक पाळीचे रक्त खूप शुद्ध औषधाप्रमाणे आहे. ३० वर्षीय जस्मिन अॅलिसिया कार्टरने न्यूज डॉग मीडियाला तिच्या कथित रामबाण उपायाबद्दल सांगितले. हा उपाय तिनं तिच्या 22,800 फॉलोअर्ससह इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.
तिच्या म्हणण्यानुसार टॅम्पोन्स आणि मासिक पाळीच्या पॅडमध्ये आपले रक्त लपवण्यासाठी आणि आपल्या मासिक पाळीच्या नैसर्गिक कार्याशी तडजोड करणारी रसायने असतात. मासिक पाळीतले रक्त शरीराला आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांनी भरलेले आहे. या आरोग्य फायद्यांचा लाभ घेण्यासाठी ती मासिक पाळीचे रक्त पिते.
ती सांगते की, ''जेव्हा मी माझ्या मासिक पाळीत रक्त पिते तेव्हा मी आधी टॉयलेटमध्ये बसते आणि टेम्पॉनमध्ये जमा झालेलं रक्त पिते. हे कधी आणि किती प्यायला हवं के मी स्वत: ठरवते. पोषक तत्वांच्या आवश्यकतेनुसार कधी एक घोट तर कधी एक कप रक्त मी घेते. त्या पोषक घटकांमध्ये प्रथिने, लोह, तांबे आणि सेलेनियम तसेच प्रतिजैविक गुणधर्म आणि अगदी पुनरुत्पादक स्टेम पेशींचा समावेश असतो.''
लग्नात नाचत होती म्हणून होणाऱ्या पतीनं कानाखाली मारली; रागारागात तिनं चुलत भावाशीच लग्नगाठ बांधली
या सोशल मीडिया स्टारने दावा केला आहे की, व्यक्ती जितकी निरोगी असेल तितके त्यांचे मासिक रक्त चांगले असते. तुम्ही दररोज जंक फूड खात असाल तर तुमचे पाळीच्या दिवसातील रक्त तितकेसे चांगले असणार नाही. जेव्हा तुम्ही मुबलक प्रमाणात पाणी आणि संतुलित आहार घ्याल तेव्हा याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्वचेसाठीही हे रक्त गुणकारी आहे.
आपला अनुभव शेअर करताना ती सांगते की,
“जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यावर मासिक पाळीचे ताजे रक्त लावले, तेव्हा ते खूप नैसर्गिक वाटले. ही त्वचेसाठी अतिशय टवटवीतपणा आणि थंडावा देणारी भावना होती.'' TikTok वर 12,300 फॉलोअर्स असलेल्या या महिलेनं पुढे सांगितले की, "मला कधीही त्वचेच्या मोठ्या समस्या आल्या नसल्या तरी, या रक्तामुळेच माझी त्वचा आता सर्वोत्तम दिसते असे मला नक्कीच वाटते."