Join us  

Social Viral : ऑनलाईन मागवलेली सोन्याची अंगठी मिळाली नाही म्हणून तिनं खोटी तक्रार केली; एका चुकीमुळे स्वत:च फसली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 7:30 PM

Social Viral : कंपनीच्या मालकांच्या म्हणण्यानुसार या महिलेला खरंच रिकामं पाकीट मिळालं आहे का, याची खात्री करण्यासाठी आम्ही तिला पाकिट व्यवस्थित दाखवण्यास सांगितले.

आजकाल आपलं  काम सोपं होण्यासाठी कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत, घरात लागणाऱ्या वस्तूही लोक ऑनलाईन ऑर्डर करतात. ऑनलाईन वस्तू ऑर्डर करताना अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते असं तुम्ही ऐकलं असेल. व्हायरल झालेल्या या प्रकरणात मात्र उलट  घडलंय. ऑर्डर केलेली अंगठी मला मिळालेलीच नाही असं सांगत महिलेनं कंपनीवर खोटी तक्रार दाखल  केली. पण फोटो अपलोड केल्यानंतर तिची एक चूक पकडली गेली आणि ती स्वत: त्यात अडकली. (Woman complains ring she ordered never arrived - photo she sends as proof shows it's on her finger)

या तक्रारीनुसार 18-कॅरेट सोन्याचा मुलामा असलेली अंगठी तिनं मागवली होती. पण ती अंगठी न मिळाल्याचा दावा करत तिनं रिफंडची मागणी केली. पुरावा म्हणून पाठवलेल्या फोटोमध्ये पाहिल्यास त्या महिलेनं ती अंगठी स्वत:च्या बोटात घातल्याचं दिसून आलं आणि तिची पोल खोल झाली. अमानी झुबेर कंपनीचे मालक, त्यांनी ग्राहकाकडून आलेल्या तक्रार ईमेलचे बारकाईने निरीक्षण केले. यात ग्राहकाने सिग्नेट रिंगची ऑर्डर दिली होती आणि  तिच्याकडून 'मला रिकामे पॅकेजिंग मिळाले आहे' असा ईमेल आला. फक्त एकच गोष्ट ऑर्डर केल्यामुळे  अशी चूक कंपनीकडून होणं अशक्य होतं. 

कंपनीच्या मालकांच्या म्हणण्यानुसार या महिलेला खरंच रिकामं पाकीट मिळालं आहे का, याची खात्री करण्यासाठी आम्ही तिला पाकिट व्यवस्थित दाखवण्यास सांगितले. त्यावेळी तिनं बोटात घातलेल्या अंगठीवरची डिजाईन आमच्या ब्रॅण्डची असल्याचं लगेच दिसून आलं.

ग्राहकाच्या बोटात "गहाळ" अंगठी असल्याचे अमानींनी निदर्शनास आणून दिले, तेव्हा तिला ब्लॉक करण्यात आले  मालकाने पुढे सांगितले,  आम्हाला वाटते की ती आमच्याकडून एक विनामूल्य अंगठी काढण्याचा प्रयत्न करत होती. हे नोव्हेंबरमध्ये घडलं होतं. परंतु आम्ही आताही त्याबद्दल हसतो. कारण आम्हाला खूप धक्का बसला होता."

अमानी यांनी TikTok वर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे जो व्हायरल झाला आहे. एका युजरनं म्हटले, "जर तुम्ही खोटे बोलत असाल आणि चोर बनण्याचा प्रयत्न करत असाल तर किमान प्रयत्न तरी नीट करा." दुसर्‍याने लिहिले, "घोटाळ्याचा प्रयत्न करण्यापूर्वी ही बाई अंगठी काढू शकली नाही."

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल