Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : बापरे! हेअर डायमुळे महिलेची अशी काही दशा झाली; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल

Social Viral : बापरे! हेअर डायमुळे महिलेची अशी काही दशा झाली; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल

Social Viral : हेअर डाई लावल्यानंतर त्यांचा चेहरा भयंकर सुजला होता. याशिवाय डोक्यावर आणि त्वचेवर लाल  पुरळ उठले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 01:45 PM2021-12-05T13:45:35+5:302021-12-05T14:14:38+5:30

Social Viral : हेअर डाई लावल्यानंतर त्यांचा चेहरा भयंकर सुजला होता. याशिवाय डोक्यावर आणि त्वचेवर लाल  पुरळ उठले.

Social Viral : Women head swelled up after hair dye use blinded for four days | Social Viral : बापरे! हेअर डायमुळे महिलेची अशी काही दशा झाली; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल

Social Viral : बापरे! हेअर डायमुळे महिलेची अशी काही दशा झाली; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल

(Image Credit- The Mirror)

वाढत्या वयात पांढरे केस काळे करण्यासाठी अनेकजण हेअर कलर वापरतात. ते तुमचे पांढरे केस लपवते आणि तुम्हाला नवीन लुक देते.  केसांना पोषण देण्याव्यतिरिक्त, केसांचा रंग चांगला दिसण्यासाठी डायची मदत होते. पण हेअर डाई लावल्यानंतर या महिलेचे काय झाले हे जाणून घेतल्यावर तुम्ही चुकूनही हेअर डाय लावणार नाही. सोशल मीडियावर  हेअर कलर वापरलेल्या एका महिलेला भितीदायक अनुभव व्हायरल होत आहे. (Hair Dye Bad Effect)  
हेअर डायमुळे चेहरा खराब झाला.

शेल्डन, वेस्ट मिडलँड येथील रहिवासी असलेल्या अनिता बेंटन यांनी केसांचा रंग लावल्यानंतर त्याांचा चेहरा खराब झाला. या महिलेला केसांच्या डाईची इतकी अॅलर्जी झाली की तिने कधीही हेअर डाई न वापरण्याची शपथ घेतली. वास्तविक, हेअर डाई लावल्यानंतर तिचा चेहरा भयंकर सुजला होता. याशिवाय डोक्यावर आणि त्वचेवर लाल  पुरळ उठले.

41 वर्षीय अनिता यांनी सांगितले की, ''केसांचा रंग लावल्यानंतर लगेचच माझे डोळे सुजले होते आणि ४ दिवस मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. यामुळे मी खूप घाबरले. 2019 पासून मी दर 6 ते 8 आठवड्यांनी हा हेअर डाई वापरत आहे. पण असा त्रास याआधी कधीच उद्भवला नव्हता.''

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय

16 ऑक्टोबर रोजी त्यांनी केसांना हेअर डाई लावताच 10 मिनिटांतच त्यांची टाळू जळू लागली. दुसऱ्या दिवशी त्यांचे केस पूर्णपणे डोक्याला चिकटले होते. यामुळे त्या दिवसभर रडतच राहिल्या. मग पुढच्या दोन दिवसात त्याचे संपूर्ण तोंड सुजले.  चेहऱ्यावर एवढी सूज होती की पापण्या बंद झाल्या होत्या, त्यामुळे काहीच स्पष्ट दिसत नव्हते. नाईलाजानं त्यांना आठवडाभर कामावरून सुट्टी घ्यावी लागली.

अनिता यांच्या म्हणण्यानुसार, त्या इतक्या भयावह दिसत होत्या की त्याचे वडीलही ओळखू शकले नाहीत. त्यांच्या बॉसला वाटले की कोणीतरी त्यांना खूप मारले आहे, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर इतकी वाईट सूज आलीये. हे चूक असल्याचं सिद्ध करण्यासाठी, त्यांना ऍलर्जीच्या औषधाचे फोटो त्यांच्या बॉसला पाठवले. 

 कंडोम वापरलं म्हणजे एचआयव्हीचा धोका टळतो? बेजबाबदार लैंगिक वर्तनामुळे तरुण मुलं मुली धोक्यात..

मिररच्या रिपोर्टनुसार, जेव्हा महिलेने श्वार्झकोफ कंपनीशी संपर्क साधला तेव्हा प्रवक्त्याने सांगितले की कंपनीने ऍलर्जीचे कारण ओळखण्यासाठी तज्ज्ञांची मदत देऊ केली होती. याशिवाय ते सर्व लोकांना सावध करतात की हेअर डाईचा वापर करण्यापूर्वी वापरण्यापूर्वी 'ऍलर्जी अलर्ट टेस्ट' अवश्य करा.
 

Web Title: Social Viral : Women head swelled up after hair dye use blinded for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.