Join us  

#Breakthebias : ९० वर्षांच्या मैत्रिणी जेव्हा वाढदिवस साजरा करतात; भन्नाट सेलिब्रेशन पाहून तुम्हालाही आठवेल जीवाभावाची दोस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 4:15 PM

#Breakthebias : वाढदिवसाच्या प्रसंगी या दोघी मैत्रिणी भावूक झाल्या आहेत. म्हातारपणात दणक्यात बर्थ डे सेलिब्रेशन करणाऱ्या या दोघी मैत्रिणी सगळ्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

सेलिब्रेशनसाठी वयाचं बंधन नसतं याचं प्रत्यक्ष उदाहरण दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सेलिब्रेशनपेक्षाही दोस्तीला वयाचं बंधन नसतं. दोस्ती वयाप्रमाणे वाढतच जाते, त्याचं हे एक उदाहरण.  एका महिलेचा  90व्या वाढदिवसाला सरप्राईज देताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३७ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये लाल केसांची वृद्ध महिला एका रेस्टॉरंटमध्ये दुसऱ्या महिलेजवळ येताना दिसत आहे. ती तिच्या मैत्रिणीला भेटते आणि मिठी मारते. वाढदिवसाच्या प्रसंगी या दोघी मैत्रिणी भावूक होतात. म्हातारपणात दणक्यात बर्थ डे सेलिब्रेशन करणाऱ्या या दोघी मैत्रिणी सगळ्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत. (Women surprises friend on her 90th birthday)

व्हिडिओवर कॅप्शन दिलं आहे की, "हा तो क्षण आहे जेव्हा माझ्या आजीच्या मैत्रिणीला ९० व्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज दिलं. इंस्टाग्रामवर गुड न्यूज मुव्हमेंट या पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ जवळपास सहा लाख वेळा पाहिला गेला आहे आणि १० हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव केला आहे. 

व्हिडिओमध्ये दाखवलेल्या दोन्ही महिलांच्या दीर्घकाळ टिकलेल्या मैत्रीबद्दल अनेकांनी कमेंट्समध्ये आश्चर्य व्यक्त केले आहे. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले की, “पूर्वीची मैत्री वेगळी आहे, तंत्रज्ञानावर विसंबून न राहता संपर्कात राहणे ही एक वेगळी गोष्ट होती, त्यामुळे ते एकमेकांना पाहू शकले याचा आनंद त्यांना खूप आहे”. दुसर्‍या व्यक्तीने ही  टिप्पणी केली की, “किती खरी मैत्री आहे. त्यांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येईल. 

टॅग्स :जागतिक महिला दिनसोशल मीडियासोशल व्हायरल