सोशल मीडियावर रोज नवीन व्हिडीओज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओज खूप संतापजनक असतात. असाच एका हॉटेलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून दावा केला जात आहे की साडी नेसल्यामुळे या महिलेला दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये एंट्री मिळालेली नाही. भारतीय संस्कृतीत पारंपारीक साडीला खूप महत्व आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या आवाजात बोलाणाऱ्या या महिलेला साडी नेसल्यामुळे आत शिरू दिलं जात नाहीये. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी झोमॅटोवर या रेस्टॉरंटचं रेटींग कमी केलं आहे.ट्विटरवर @anitachoudhary नावाच्या युजरकडून हा १६ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, दिल्लीतील Aquila रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला आत जाण्यापासून अडवलं.
(Saree is not allowed in Aquila restaurant as Indian Saree is now not an smart outfit.What is the concrete definition of Smart outfit plz tell me @Amit... @HardeepSPuri @CPDelhi @NCWIndia Please define smart outfit so I will stop wearing saree) असं कॅप्शन या व्हिडीओला दिलंय.
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून येण्याची परवानगी नाहीये. कारण भारतीय साडी आता स्मार्ट पोशाख नाही. स्मार्ट पोशाखाची परिभाषा काय आहे कृपया मला सांगावे. जेणेकरून मी साडी नेसणं बंद करेन. या व्हिडीओमध्ये महिलेनं भारत सरकारच्या अनेक मंत्र्यानाही टॅग केलं आहे. आता हेच बाकी होतं! ऑनलाईन क्लासमध्ये डमी ठेवून खुशाल झोपली; तुफान व्हायरल होतेय ट्रिक
या व्हिडीओवर लोकांनी एकापेक्षा एक संतप्त कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. एका युजरनं म्हटलं आहे की, काय परिधान करणं स्मार्ट आहे हे कोण ठरवतंय. तर एकानं म्हटलंय, ही घटना खरी असेल तर हे खूप वाईट आहे. या सगळ्याचा वाईट परिणाम रेस्टॉरंटच्या रेटिंगवर दिसून येतोय. रिपोर्टनुसार गुगलवर १.१/५ तर झोमॅटोवर २/५ रेटिंग आहे. ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म, डॉक्टरवर गुन्हा दाखल