पावसाळ्यातच नाही तर इतरवेळी देखील आपण घराबाहेर आवर्जून डोअर मॅट ठेवतो. पावसाळ्यात बाहेरची घाण घरात येऊ नये म्हणून आपण दारात एखाद पाय पुसणं किंवा डोअर मॅट ठेवतो. घर स्वच्छ ठेवण्यासाठी दाराजवळ डोअर मॅट असणे खूप महत्त्वाचे आहे. या डोअर मॅटला आपण आपले घाणेरडे पाय पुसून मगच घरात प्रवेश करतो. असे केल्याने आपले पाय तर स्वच्छ होतात परंतु डोअर मॅट दिवसेंदिवस खराब होत जाते. ही खराब झालेली डोअर मॅट स्वच्छ करण हा एक मोठा टास्कच असतो.
डोअर मॅट इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात अधिकच खराब होतात. काहीवेळा तर या डोअर मॅटमध्ये, पावसाळ्यात आपल्या पायाने आलेला चिखल साचून राहतो. हा साचलेला चिखल एका धुण्यात सहज निघतोच असे नाही. अशावेळी ही डोअर मॅट रगडून धुवून स्वच्छ करण्याशिवाय इतर कोणतेही पर्याय आपल्यापुढे नसतात. काहीवेळा तर डोअर मॅटवर चिखल अडकून राहिल्यामुळे कितीहीवेळा ती रगडून धुतली तरी स्वच्छ होतंच नाही. अशा परिस्थितीत काही घरगुती सोप्या टिप्सचा वापर करुन आपण ही डोअर मॅट घरच्या घरीच स्वच्छ करु शकतो. डोअर मॅट स्वच्छ करण्यासाठी नेमके काय घरगुती उपाय आहेत ते पाहूयात(Soil is stuck on the door mat in the rain, clean it in 5 ways).
पावसाळ्यात घराबाहेरील डोअर मॅट स्वच्छ करण्याचे काही सोपे उपाय :-
१. डिटर्जंटचा वापर करा :- सर्वप्रथम एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यात सौम्य डिटर्जंट घालावे. हे डिटर्जंट पाण्यांत व्यवस्थित मिसळून घ्यावे. त्यानंतर किमान तासभर ही डोअर मॅट या डिटर्जंटच्या पाण्यांत बुडवून ठेवावी. त्यानंतर डिटर्जन्टच्या पाण्यांतून काढून स्क्रबरच्या मदतीने घासून घ्यावे. यामुळे त्यात अडकलेली घाण सहज निघण्यास मदत होईल. त्यानंतर ही डोअर मॅट उन्हांत संपूर्णपणे वाळवून घ्यावी.
करा 5 उपाय, टॉयलेट मध्ये कधीच येणार नाही दुर्गंधी, वाटेल फ्रेश...
२. बेकिंग सोडा वापरा :- डोअर मॅटवर लागलेले चिखलाचे डाग कितीही धुतले तरीही त्यांचे हट्टी डाग कायमचे मागे राहतात. हे हट्टी डाग काढून टाकण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा देखील वापर करु शकतो. एका मोठ्या भांड्यात थोडे गरम पाणी घेऊन त्यात २ ते ३ चमचे बेकिंग सोडा घालावा. बेकिंग सोडा या पाण्यांत संपूर्णपणे मिसळून घ्यावा. आता ही तयार झालेली पेस्ट डोअर मॅटवर असणाऱ्या हट्टी डागांवर लावून ब्रशच्या मदतीने घासून घ्यावे. त्यानंतर डोअर मॅट सौम्य साबण किंवा डिटर्जंटच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्यावी.
मळके सॉफ्ट टॉईज धुण्याच्या सोप्या ४ पद्धती, सॉफ्ट टॉईज होतील स्वच्छ, चमकदार...
३. रबरी डोअर मॅट अशी करा स्वच्छ :- रबरी डोअर मॅटला वरच्या बाजूने छोटे छोटे रबरी पाईप असतात. अशा मॅटची स्वच्छता थोडी अवघड असते. दर ३ ते ४ दिवसांआड व्हॅक्युम क्लिनर वापरून अशा मॅट स्वच्छ कराव्यात. महिन्यातून एकदा सौम्य डिटर्जंट वापरून ती स्वच्छ करावी. हेवी डिटर्जंट वापरू नये. तसेच ही मॅट खूप कडक उन्हात वाळवू नये, यामुळे त्याचे रबरी पाईप खराब होण्याची शक्यता असते.
४. नारळाच्या शेंड्यापासून बनवलेल्या मॅट :- बेज, ब्राऊन या रंगात उपलब्ध असणाऱ्या या मॅट नारळाच्या शेंड्यापासून बनविलेल्या असतात. या प्रकारच्या मॅट मध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त असते. अशा मॅट स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. या मॅट स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी त्यातला कचरा, घाण व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा. त्यानंतर त्याला ड्राय वॉशिंग करावे. ड्राय वॉशिंगसाठी कॉर्न स्टार्च आणि बेकींग सोडा यांचे मिश्रण वापरू शकता. हे मिश्रण मॅटवर टाका. ३० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानुंतर पुन्हा एकदा व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करून मॅट स्वच्छ करून घ्या.
५. कापडी डोअर मॅट :- कापडी डोअर मॅट स्वच्छ करायला अतिशय सोपे असतात. महिन्यातून एकदा ते गरम पाण्यात थोडा बेकींग सोडा टाकून अर्धातास भिजत ठेवा. त्यानंतर आपण ते हाताने धुवू शकता किंवा मशिन वॉश करू शकता. फक्त ब्रशने त्यावर न घासता ते सौम्यपणे धुवावे.
किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...
६. आपण डोअर मॅट वॉशिंगमध्ये धुवू शकतो का ?
आजकाल अनेक प्रकारचे डोअर मॅट बाजारांत सहज उपलब्ध होतात. काही डोअर मॅट वॉशिंग मशिनमध्ये धुता येतात आणि काही हातानेच धुवावे लागतात. जर आपल्या डोअर मॅटचा फूटरेस्ट रबरचा असेल तर तो वॉशिंग मशिनमध्ये चुकूनही धुवायला टाकू नका. अनेक वेळा जाड डोअर मॅट मशीनमध्ये टाकल्यावरही फाटते. त्यामुळे डोअर मॅट शक्यतो हातानेच धुवावेत.