Lokmat Sakhi >Social Viral > डार्क कलरच्या कपड्यांवर पांढरे डाग पडतात? वॉशिंग मशिनमध्ये घाला १ गोष्ट-डाग एका धुण्यात गायब...

डार्क कलरच्या कपड्यांवर पांढरे डाग पडतात? वॉशिंग मशिनमध्ये घाला १ गोष्ट-डाग एका धुण्यात गायब...

How to wash dark & black cloths : The Right Way to Wash Your Dark Clothes, From Whites to Brights : काही सोप्या उपायांचा वापर करुन गडद रंगांच्या कपड्यांवरील पांढरे डाग अगदी सहजरित्या काढू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 06:53 PM2024-08-24T18:53:29+5:302024-08-24T19:09:00+5:30

How to wash dark & black cloths : The Right Way to Wash Your Dark Clothes, From Whites to Brights : काही सोप्या उपायांचा वापर करुन गडद रंगांच्या कपड्यांवरील पांढरे डाग अगदी सहजरित्या काढू शकतो.

some tips for washing dark-colored clothes How to wash dark & black cloths | डार्क कलरच्या कपड्यांवर पांढरे डाग पडतात? वॉशिंग मशिनमध्ये घाला १ गोष्ट-डाग एका धुण्यात गायब...

डार्क कलरच्या कपड्यांवर पांढरे डाग पडतात? वॉशिंग मशिनमध्ये घाला १ गोष्ट-डाग एका धुण्यात गायब...

आपल्याकडील गडद रंगांचे कपडे धुतानाचा एक मोठा टास्क म्हणजे त्यावरचे पांढरे हट्टी डाग. काही कपड्यांवरील हट्टी डाग काढताना नाकीनऊ येतात. काहीवेळा हे डाग काढता काढता कपड्यांचा मूळ रंग फिका पडण्याची शक्यता असते. अनेकदा आपण पाहिले असेल की, आपल्याकडील काळ्या, निळ्या किंवा गडद रंगांच्या कपड्यांवर धुतल्यानंतर देखील पांढरे डाग दिसतात. गडद रंगांच्या कपड्यांवर पडलेले हे पांढरे डाग अगदी सहज स्पष्टपणे दिसून येतात, त्यामुळे कपड्यांची चमक नाहीशी होऊन कपडे जुने दिसू लागतात. गडद रंगांच्या कपड्यांवर पांढरे डाग पडल्यास नवीन कपडे देखील जुने वाटू लागतात(How to wash dark & black cloths).

गडद रंगांच्या कापडयांवरील पांढरे डाग काढण्यासाठी आपण अनेकदा खूप प्रयत्न करुन पाहतो. गडद रंगांच्या कपड्यांवरील पांढरे डाग काढण्यासाठी आपण हे कपडे वारंवार धुतो, असे कपडे वारंवार धुवून त्यांचा रंग फिका पडतो परंतु हे हट्टी पांढरे डाग काही जात नाही. अशावेळी आपण काही सोप्या उपायांचा वापर करुन झटपट गडद रंगांच्या कपड्यांवरील पांढरे डाग अगदी सहजरित्या काढू शकतो(How to wash dark clothes in washing machine).

वॉशिंग मशीनमध्ये गडद रंगांच्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी... 

वॉशिंग मशीनचा वापर करुन गडद रंगांच्या कपड्यांवरील पांढरे डाग काढून टाकण्यासाठी एक सोपा उपाय करु शकतो. यासाठी सर्वात आधी वॉशिंग मशीनमध्ये वॉशिंग पावडर आणि कपड्यांचे कंडिशनर आणि पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यावे. त्यानंतर त्यात पांढरे डाग पडलेले काळे किंवा गडद रंगांचे कपडे घालावेत. सगळ्यात शेवटी मशीनमध्ये अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा एक बोळा करुन घालावा.

गडद रंगांचे कपडे धुताना त्यात स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी निर्माण होते यामुळे यांवर लिंट तयार होऊन पांढरे डाग तयार होतात. असे कपडे धुताना त्यात अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे काही बोळे घातल्यामुळे अ‍ॅल्युमिनियम फॉईल स्टॅटिक इलेक्ट्रिसीटीला आपल्याकडे खेचून घेतो यामुळे गडद रंगांच्या कपड्यांवर पांढरे डाग पडत नाहीत. यासोबतच शक्यतो काळ्या किंवा गडद रंगांचे कपडे धुवायला टाकताना ते नेहमी उलटे करून म्हणजेच आतली बाजू वर करुन धुवायला टाकावेत यामुळे त्यावर फारसे काळे डाग पडत नाहीत. 

स्टीलच्या कढईत पदार्थ लागतो - लवकर करपतो? १ खास ट्रिक, स्टील कढई वापरण्याची योग्य पद्धत... 


टॉयलेट सीट पिवळी-अस्वच्छ दिसते? ३ सोपे उपाय, स्वच्छ-पांढरेशुभ्र दिसेल कमोड-इन्फेक्शनही टळेल...

इतर उपाय... 

१. लिंबाचा रस :- या पांढऱ्या डागावर लिंबाचा रस लावा, सुमारे १० मिनिटे तो तसाच राहू द्यावा नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
२. बेकिंग सोडा पेस्ट :- पेस्ट तयार करण्यासाठी बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळा. ते डागावर लावा आणि १५  मिनिटांसाठी तसेच राहू द्या, नंतर स्वच्छ धुवा.
३. फॅब्रिक ब्रशने घासणे :- गडद कपड्यांवरील पांढरे डाग घालवण्यासाठी फॅब्रिक ब्रश किंवा मऊ टूथब्रशने डाग असलेली जागा हळुवारपणे ब्रश करा.

Web Title: some tips for washing dark-colored clothes How to wash dark & black cloths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.