Lokmat Sakhi >Social Viral > १ नंबर! लेकानं वडिलांना वाढदिवसाला सरप्राइज भेट दिली त्यांची 'ड्रिम बाईक'; वडिलांची रिॲक्शन पाहून डोळ्यात पाणीच येईल..

१ नंबर! लेकानं वडिलांना वाढदिवसाला सरप्राइज भेट दिली त्यांची 'ड्रिम बाईक'; वडिलांची रिॲक्शन पाहून डोळ्यात पाणीच येईल..

Son gifts father his dream bike on his birthday : या तरूणानं त्याच्या वडिलांना अगदी नवीकोरी बाईक देऊन आश्चर्यचकित केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:14 AM2022-12-13T10:14:55+5:302022-12-13T15:44:37+5:30

Son gifts father his dream bike on his birthday : या तरूणानं त्याच्या वडिलांना अगदी नवीकोरी बाईक देऊन आश्चर्यचकित केले.

Son gifts father his dream bike on his birthday viral video will make your teary eyed | १ नंबर! लेकानं वडिलांना वाढदिवसाला सरप्राइज भेट दिली त्यांची 'ड्रिम बाईक'; वडिलांची रिॲक्शन पाहून डोळ्यात पाणीच येईल..

१ नंबर! लेकानं वडिलांना वाढदिवसाला सरप्राइज भेट दिली त्यांची 'ड्रिम बाईक'; वडिलांची रिॲक्शन पाहून डोळ्यात पाणीच येईल..

आपल्या मुलांनी मोठं होऊन नाव मिळवावं. कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात  अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. मुलं शिकून आपल्या पायावर उभं राहिल्याचा आनंद काही वेगळाच असतो. असाच एक बापलेकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे उज्जवल सिडनाग नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. (Son gifts father his dream bike on his birthday viral video will make your teary eyed)

या तरूणानं त्याच्या वडिलांना अगदी नवीकोरी बाईक देऊन आश्चर्यचकित केले. त्याच्या वडिलांचा 59 वा वाढदिवस होता आणि त्यांना लेकाकडून रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेला बॉक्स मिळाला. त्यांनी तो बॉक्स उघडल्यानंतर ती त्याच्या नवीन दुचाकीची चावी सापडली. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की जवळजवळ त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर घराबाहेर पार्क केलेली दुचाकी पाहण्यासाठी ते घराबाहरे पडले. त्यांनी त्यांच्या ड्रिमबाईकबरोबर काही  फोटोसुद्धा काढले. 

“तुमच्याबद्दल व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत, तू माझा सुपरमॅन आहेस, सर्व काही सुपर गॉड आहेस. माझ्या वडिलांना नेहमी माझ्या आजोबांची बाईक आवडयाची. त्याची किंमत विचारण्यासाठी आम्ही शोरूमला भेट दिली पण माझे वडील म्हणायचे  हे आपल्याला परवडणार नाही ती खूपच महाग आहे.  त्यामुळे त्यांना आनंद देणारी यापेक्षा मोठी भेट  यापेक्षा कोणती असूच शकत नाही असे वाटले! त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला शक्ती दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे, 

आज मी जे काही आहे ते तुमच्या पाठिंब्यामुळे आहे. मला अजूनही आठवते की, जेव्हा मी माझी नोकरी सोडली तेव्हा तुम्ही मला सांगितले  की तुला व्यवसाय करायचा तर तसं कर आम्ही तुझ्या पाठिशी आहोत. यापेक्षा मी आणखी काय विचारू शकतो, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे,” असे उज्जवलनं एका मोठ्या पोस्टमध्ये लिहिले.

Web Title: Son gifts father his dream bike on his birthday viral video will make your teary eyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.