जन्मल्यापासून मोठं होऊन स्वत;च्या पायांवर उभं राहीपर्यंत पालक आपल्या मुलांना कोणतीही अपेक्षा न ठेवता सगळ्याच बाबतीत पाठिंबा देतात. त्यांच्या कष्टाची जाण ठेवून समाजात स्वत:ची वेगळी ओळख तयार करणं ही मुलांची जबाबदारी असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मायलेकांचं एकमेकांवरील प्रेम दर्शवतो.(Son surprises mother with new gold chain)
छोटा सा गिफ्ट मम्मी के लिए 👩❤️💋👨🎁💐 pic.twitter.com/WPUc7fTvRj
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 14, 2022
आपण कमावयाला लागल्यावर आई वडिलांसाठी भेटवस्तू घ्याव्यात, त्यांना सुखात ठेवावं, त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये असं प्रत्येक मुलाला वाटतं. या व्हिडिओमध्ये एक तरूण आपल्या आईला सोन्याची चेन गिफ्ट देतो. लेक असं काही करेल याची आईला जराही कल्पना नसते. आई सगळ्यांना जेवण वाढत असते त्याचवेळी लेक येऊन सोन्याची चेन गळ्यात घालतो. त्यानंतर आईच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटतं ते खरोखरच पाहण्यासाखं असतं. (Son surprises mother with new gold chain her million dollar smile will melt your heart)
मित्राच्या लग्नाला ‘ते’ दोघं गेले चक्क साडी नेसून, कारण.....पाहा व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडिया युजर्स या हृदयस्पर्शी व्हिडिओनं भावूक झाले आहेत. आतापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून या व्हिडिओवर कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'आईसाठी छोटंसं गिफ्ट', असं कॅप्शन या व्हिडियोला देण्यात आलं आहे. लेक असावा तर असा अशी कमेंट एका युजरनं केली आहे. या व्हिडिओला तरूण मंडळींचं खूप प्रेम मिळत आहे. या मुलाच्या प्रयत्नाचं कौतुक अनेकांना वाटतंय.