Lokmat Sakhi >Social Viral > सोनम कपूरने घातले चक्क मुलतानी मातीचे ब्लाऊज, सोनमच्या दिवाळी लूकचीच चर्चा-ही कुठली नवीच फॅशन...

सोनम कपूरने घातले चक्क मुलतानी मातीचे ब्लाऊज, सोनमच्या दिवाळी लूकचीच चर्चा-ही कुठली नवीच फॅशन...

Sonam Kapoor Wears Sculpted Multani Mitti Outfit : Sonam Kapoor looks ethereal in khadi lehenga and body ornament made of 'multani mitti' : Sonam Kapoor Wears Unique Clay Blouse, Celebrates Diwali with an Eco-Friendly Look : पारंपरिक कपड्यांची शौकीन असलेल्या सोनम कपूरने दिवाळी लूकसाठी घातले असे आकर्षक ब्लाऊज..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 02:13 PM2024-10-29T14:13:18+5:302024-10-29T14:14:02+5:30

Sonam Kapoor Wears Sculpted Multani Mitti Outfit : Sonam Kapoor looks ethereal in khadi lehenga and body ornament made of 'multani mitti' : Sonam Kapoor Wears Unique Clay Blouse, Celebrates Diwali with an Eco-Friendly Look : पारंपरिक कपड्यांची शौकीन असलेल्या सोनम कपूरने दिवाळी लूकसाठी घातले असे आकर्षक ब्लाऊज..

Sonam Kapoor Wears Sculpted Multani Mitti Outfit Sonam Kapoor looks ethereal in khadi lehenga and body ornament made of 'multani mitti' Sonam Kapoor Wears Unique Clay Blouse, Celebrates Diwali with an Eco-Friendly Look | सोनम कपूरने घातले चक्क मुलतानी मातीचे ब्लाऊज, सोनमच्या दिवाळी लूकचीच चर्चा-ही कुठली नवीच फॅशन...

सोनम कपूरने घातले चक्क मुलतानी मातीचे ब्लाऊज, सोनमच्या दिवाळी लूकचीच चर्चा-ही कुठली नवीच फॅशन...

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर (Sonam Kapoor Desi Look) फॅशनिस्ट म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटांपेक्षा आपल्या फॅशन स्टाइलसाठीच अधिक प्रसिद्ध आहे. तिला बॉलिवूडमध्ये ‘फॅशन ट्रेंड सेटर’ या नावानेही ओळखले जाते. कोणतीही नवीन फॅशन स्टाइल किंवा ट्रेंड आल्यानंतर बहुतांश वेळा सोनम कपूरकडून त्या फॉलो होताना दिसतात, यामुळेच तिला हे नाव देण्यात आलं आहे. परदेशातील स्टाइल ट्रेंड देखील ती अगदी बिनधास्तपणे  फॉलो करुन फ्लॉन्ट करताना दिसते(Sonam Kapoor Wears Sculpted Multani Mitti Outfit).

बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर अनेकदा तिच्या अनोख्या आणि स्टायलिश फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. यावेळी दिवाळीच्या मुहूर्तावर सोनमने तिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. साडी, घागरा, लेहेंगा यांसारख्या पारंपरिक कपड्यांची शौकीन असलेल्या सोनम कपूरने तिच्या दिवाळी लूकसाठी चक्क मुलतानी मातीपासून तयार केलेला ब्लाऊज घातला आहे. मुलतानी मातीचा वापर आजपर्यंत आपण ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये तसेच स्किन व केसांसाठी करतो पण चक्क यापासून ब्लाऊज तयार होऊ शकतो हे कल्पनाच करणं थोडं अवघड आहे(Sonam Kapoor looks ethereal in khadi lehenga and body ornament made of 'multani mitti').

सोनम कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पारंपरिक लेहेंग्यातील फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने चक्क मुलतानी मातीपासून तयार केलेला ब्लाऊज परिधान केला आहे. सोनम कपूरने खास दिवाळीसाठी फोटोशूट करताना खादीचा लेहेंगा आणि मुलतानी मातीपासून बनवलेली अनोखी चोली  परिधान केल्याचे दिसत आहे. तिची ही चोली कर्नाटकातील लाल माती आणि मुलतानी मातीपासून बनवलेली असल्याचे सांगितले जात आहे. यासोबत सोनमने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला खादीचा लेहेंगा घातला आहे, जो तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. सोनम कपूरचा हा दिवाळी लूक तिची धाकटी बहीण रिया कपूर आणि तिची स्टायलिंग टीम वंशिका मक्कर आणि सनाया कपूर यांनी तयार केला आहे(Sonam Kapoor Wears Unique Clay Blouse, Celebrates Diwali with an Eco-Friendly Look).

फोटोंच्या कॅप्शनमध्ये पोशाखाबद्दल बोलताना सोनम कपूरने लिहिले की, “हा केवळ एक पोशाख नाही तर आपल्या मातीशी आणि परंपरांशी जोडलेली एक खास भावना आहे.”  तिने तिचा संपूर्ण पोशाख दिवाळी सण, देव, देवी आणि पृथ्वीला समर्पित केला असल्याचे तिने सांगितले आहे. 

बॅकलेस ड्रेस घातला की ब्रेसियची पट्टी दिसते? २ सोप्या टिप्स- दिवाळी पार्टीसाठी करा खास लूक...


Diwali : महागडी साडी तर घेतली पण ब्लाऊजसाठी फॅशनेबल गळा शिवायचाय? ७ प्रकार-नवेकोरे फॅशनेबल पॅटर्न...

सोनमने या आऊटफिटवर शोभेल असा न्यूड मेकअप केला आहे. यासोबतच तिने तिच्या हातांवर अगदी बारीक नाजूक नक्षीकाम असणाऱ्या डिझाईनची सुंदर मेहेंदी देखील काढली आहे. मेकअप देखील फार डार्क आणि हेव्ही न करता, मिनिमल मेकअपला प्राधान्य दिले आहे. यासोबतच तिने या लेहेंगा चोलीवर हिरव्या रंगाच्या रुबी मण्यांची जाड माळ घातली आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून येत आहे.

 

सोनमचा हा दिवाळी लूक तिच्या फॅनस पैकी काहीजणांना आवडला तर काहींनी तिच्यावर टीका करत ड्रेस न आवडल्याचे आपल्या नकारातून स्पष्ट सांगितले आहे. सोनमचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना उर्फी जावेदची आठवण आली. सोनम उर्फीच्या एक पाऊल पुढची निघाली असंही कित्येक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. सोनमने परिधान केलेल्या आऊटफिट्सची निवड जरी आश्चर्यकारक असली तरी तिने ज्या प्रकारे संपूर्ण लुक स्टाईल आणि कॅरी केला, तो निश्चितच कौतुकास्पद आहे.

Web Title: Sonam Kapoor Wears Sculpted Multani Mitti Outfit Sonam Kapoor looks ethereal in khadi lehenga and body ornament made of 'multani mitti' Sonam Kapoor Wears Unique Clay Blouse, Celebrates Diwali with an Eco-Friendly Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.