प्रेमात पडल्यावर आवडती व्यक्ती प्रायोरिटी लिस्टवर प्रथम क्रमांकावर असते (Gianmarco Tamberi). आता क्रिकेटर विराट कोहलीच (Virat Kohli) पाहा, वर्ल्ड कप जिंकताच त्याने आधी पत्नी अनुष्का शर्माला व्हिडिओ कॉल लावला आणि आनंद शेअर केला (Olympic). काही जण वेळ नाही, किंवा आपल्या पार्टनरबाबत सोशल मीडियात शेअर करण्यास टाळतात. काही लोक पार्टनर रुसल्यावर त्यांची नाराजी दूर करायला एफर्ट्स घेत नाही. ज्यामुळे नात्यात दुरावा येतो.
सध्या ऑलिम्पिकचा सिझन सुरु आहे. सीन नदी तीरावर पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा पार पडला. पण या उद्घाटन सोहळ्यामुळे एका खेळाडूची कोंडी झाली. ज्यामुळे त्याला जाहीररीत्या बायकोची माफी मागावी लागली(“Sorry, my love” - Italian gold medallist Gianmarco Tamberi apologizes to his wife after losing his wedding ring in the Seine River).
लग्नाची अंगठी नदीत पडली..आणि मग
सध्या एका खेळाडूची बायकोसाठी जाहीररित्या माफी मागितलेली पोस्ट व्हायरल होत आहे. इटालियन उंच उडीपटू जियानमार्को तांबेरी असे खेळाडूचे नाव. तो इटलीचा ध्वजवाहक होता, एवढं मोठं सन्मान लाभला, देशाचे प्रतिनिधित्व करता आले पण त्या आनंदात एक गडबड झाली.
फक्त वयाच्या १४ व्या वर्षी ऑलिम्पिक पर्यंत पोहचली भारताची धिनिधी, पोहण्यात तरबेज मुलीची वाचा जिद्द
ध्वज फडकवत असताना बोट जशी सीन तीरावर पोहोचली तेव्हा, त्याच्या बोटातून अंगठी पाण्यात पडली. त्यानंतर जियानमार्को इतकी अवस्था बिकट झाली की, त्याने इन्स्टापोस्ट लिहून पत्नी चियारा बोनटेम्पी तांबरेची माफी मागितली.
'सॉरी माय लव्ह म्हणत बायकोची माफी'
त्याने लग्नाचे फोटो पोस्ट करीत कॅप्शनमध्ये, 'सॉरी माय लव्ह. गेल्या काही महिन्यांत बरेच किलोग्रॅम वजन घटवले. आणि अति उत्साहामुळे कदाचित बोटातून अंगठी निसटून नदीत पडली.' त्याने पुढे रोमॅण्टिक होत पुढे लिहिले, 'आपल्या लग्नाची अंगठी हरवण्यासाठी यापेक्षा चांगल्या जागेची मी कल्पना करू शकत नाही. अंगठी आता प्रेमाच्या शहराच्या नदी पात्रात कायमची राहणार आहे.'
शिवाय त्याने पत्नी चियाराला देखील नदीत अंगठी फेकण्याचा सल्ला दिला. तो पुढे म्हणतो, 'चियारा तू देखील तुझी अंगठी प्रेमाच्या नदीत फेक. मग आपण या नदीत कायमचे एकत्र राहू. मग पुन्हा लग्न करण्यासाठी आपल्याला आणखीन एक निमित्त मिळेल.' या जोडप्याचं लग्न २०२२ साली झालं होतं.