Join us  

अमेरिकन रेस्टॉरंटनं इडली-डोशाला ठेवली वाट्टेल ती भयंकर नावं, मेन्यूकार्ड व्हायरल होताच लोक म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 3:33 PM

South indian food name changed restaurant in america : एका युजरनं स्क्रिनशॉट काढून हा फोटो शेअर केला आहे. 

नावात काय ठेवलंय?  हे प्रसिद्ध लेखक शेक्सपिअरचं वाक्य तुम्ही ऐकलंच असेल. पण तुम्ही कधी भारतीय खाद्यपदार्थांची बदलेली नावं वाचलीयेत का? जर नसेल वाचली तर ही सध्या व्हायरल होणारी बातमी वाचून तुम्हालाही धक्का बसेल.  अमेरिकेतील भारतीय रेस्टॉरंट इंडियन क्रेप कंपनीचा (Indian Crepe Co.) मेन्यू ऑनलाईन ट्रोल होत आहे. (Idli dosa sambhar vada name changed by indian crepe)

एका युजरनं स्क्रिनशॉट काढून हा फोटो शेअर केला आहे. रेस्टॉरंटमध्ये इडली, डोसा यांसारखे साऊथ इंडीयन पदार्थ मिळतात पण त्यांची मूळ नावं बदलून भलतीच नावं दिली आहेत. (South indian food idli dosa sambhar vada name changed by indian crepe restaurant in america)

 आपल्या प्रत्येकाच्याच आवडत्या इडली-सांबारचे नाव डंकेड राइस केक डिलाइट असं ठेवलंय. एवढेच नाही तर आणखी एक दक्षिण भारतीय स्नॅक्स सांभर-वडा या डीशला रेस्टॉरंटने डंकेड डोनट डिलाइट असे नाव दिले आहे. जरी तुम्ही भारतात अनेक प्रकारचे डोसे चाखले असतील, परंतु या रेस्टॉरंटमध्ये त्याला एक विचित्र नाव देण्यात आले आहे. साध्या डोश्याचे नेकेड क्रेप असे नामकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मसाला डोसा हे नाव आणखीनच मजेशीर आहे. मसाला डोश्याला 'स्मॅशेड पोटॅटो क्रेप' असे नाव देण्यात आले.

\

मेन्यूचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना यूजर स्क्रीनग्रॅबने त्याच्या कॅप्शनमध्ये 'OMFG' असे लिहिले आहे. जरी नाव अद्वितीय ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही ट्विटर युजर्स प्रभावित झाले नाही. उलट हा प्रकार ट्रोल झाला.

बापलेकीच्या जोडीनं गायलेलं किशोर कुमारचं गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल लो आने लगा जिंदगी का मजा.. पाहा व्हिडिओ

एका वापरकर्त्याने दुसर्‍या रेस्टॉरंटच्या मेन्यूची तुलना केली, ज्यात मिस्टर स्पायसी क्रेप आणि बेबी कॉकटेल पॅनकेक सारख्या पदार्थांचा समावेश आहे, जे डोसा आणि उत्तपम असे पदार्थ आहेत. क्लासिक डिशच्या या अनोख्या नावांबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया