Lokmat Sakhi >Social Viral > ऐकावं ते नवलच! बायकोला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून नवऱ्यानं खरेदी केली चंद्रावर जमीन, हे कसं जमलं?

ऐकावं ते नवलच! बायकोला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून नवऱ्यानं खरेदी केली चंद्रावर जमीन, हे कसं जमलं?

सिनेमातूनही प्रेयसीला  चंद्र आणून देण्याचं वचन देण्याचा काळ बराच मागे पडलाय. तो किती मागे पडलाय हे सांगण्यासाठी हिमाचल प्रदेशातली एक बातमी पुरेशी आहे. आपल्या बायकोच्या वाढदिवसाचं (birthday gift) गिफ्ट म्हणून नवऱ्यानं बायकोसाठी तिच्या नावावर थेट चंद्रावर जमीनच (land on moon) विकत घेतली आणि वाढदिवसाच्या दिवशी तिच्या हातात जागा विकत घेतल्याची कागदपत्रंच सोपवली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 02:07 PM2022-07-20T14:07:22+5:302022-07-20T14:16:20+5:30

सिनेमातूनही प्रेयसीला  चंद्र आणून देण्याचं वचन देण्याचा काळ बराच मागे पडलाय. तो किती मागे पडलाय हे सांगण्यासाठी हिमाचल प्रदेशातली एक बातमी पुरेशी आहे. आपल्या बायकोच्या वाढदिवसाचं (birthday gift) गिफ्ट म्हणून नवऱ्यानं बायकोसाठी तिच्या नावावर थेट चंद्रावर जमीनच (land on moon) विकत घेतली आणि वाढदिवसाच्या दिवशी तिच्या हातात जागा विकत घेतल्याची कागदपत्रंच सोपवली.

Special Birthday Gift to wife. Husband bought a land on the moon as a birthday gift to his wife. | ऐकावं ते नवलच! बायकोला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून नवऱ्यानं खरेदी केली चंद्रावर जमीन, हे कसं जमलं?

ऐकावं ते नवलच! बायकोला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून नवऱ्यानं खरेदी केली चंद्रावर जमीन, हे कसं जमलं?

Highlightsचंद्रावर बायकोच्या नावानं जमीन विकत घेण्याचं हरीश महाजन यांनी दोन वर्षांपूर्वीच ठरवलं.चंद्रावर जमीन विकत घेण्याच्या प्रक्रियेला एक वर्ष लागलं.चंद्रावर जमीन विकत घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागले हे मात्र हरीश महाजन यांनी बायकोला आणि इतरांनाही  सांगितले नाही. 

प्रियकराने प्रेयसीला आपलं तिच्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी चंद्रावर घेऊन जाण्याचं किंवा चंद्रच प्रेयसीसाठी जमिनीवर आणण्याचं वचन दिल्याचं आपण पुस्तकात वाचलं आहे, सिनेमातही पाहिलं आहे. पण प्रेयसीसाठी चंद्र जमिनीवर आणणं ही फॅंटसी म्हणूनच स्वीकारली गेली. हा कल्पनाविलास इतका मोहक वाटला की काय हा प्रियकर अव्वाच्या सव्वा बाता मारतोय अशी टीकाही कधी झाली नाही. पण सिनेमातूनही प्रेयसीला असं चंद्राचं वचन देण्याचा काळ आता बराच मागे पडलाय. तो किती मागे पडलाय हे सांगण्यासाठी हिमाचल प्रदेशातली एक बातमी पुरेशी आहे. आपल्या बायकोच्या वाढदिवसाचं (birthday gift) गिफ्ट म्हणून नवऱ्यानं बायकोसाठी तिच्या नावावर थेट चंद्रावर जमीनच (land on moon)  विकत घेतली आणि वाढदिवसाच्या दिवशी (birthday gift to wife) तिच्या हातात जागा विकत घेतल्याची  कागदपत्रंच सोपवली. 

Image:  Dainkik Bhaskar

23 जून 2022 रोजी हिमाचल प्रदेश येथे राहाणाऱ्या पूजा सूद यांचा 43 वा वाढदिवस होता. आपल्या बायकोला वाढदिवसाची अनोखी आणि मौल्यवान भेटवस्तू देण्याचं त्यांचे पती हरीश महाजन यांनी ठरवलं. पण आपल्या मनात काय चाललंय याचा जराजी अंदाज बायकोला येवू दिला नाही. 22 जूनच्या रात्री नेहमीप्रमाणे पूजा झोपायला गेल्या. बायको झोपायला गेल्यावर हरीश यांनी आपल्या 11 वर्षाच्या मुलाच्या सोबतीनं पूजा यांना सरप्राईज देण्याचं ठरवलं. रात्री बारा वाजता त्यांनी पूजाला झोपेतून उठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना हाॅलमध्ये घेऊन आले. हाॅलमध्ये केक कापल्यानंतर हरीश यांनी पूजाच्या हातात काही कागदपत्रं दिली. ही कागदपत्रं चंद्रावर घेतलेल्या जमिनीची होती. कागदपत्रांवरचा सर्व तपशील वाचल्यावर आपण वास्तवात आहोत की स्वप्नात हेच पूजा यांना कळलं नाही. आपण चंद्रावर एक एकर जमिनीच्या मालक झाल्याच्या आनंदानं त्यांन आपण कोणीतरी सेलिब्रेटी झाल्यासारखं वाटल. या कागदपत्रावरील आपलं नाव बघून हे स्वप्न नसून वास्तव असल्याची जाणीव पूजा सूद यांना झाली.  

Image:  Dainik Bhaskar

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना जेवढेही फोन आहे त्या सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरून माध्यमांमध्येही प्रसिध्द झाली. बाहेर पडल्यानंतर जो तो त्यांना चंद्रावरच्या जागेबद्दल विचारु लागला. चंद्रावरच्या आपल्या नावावरच्या जमिनीवर खरंच कधी आपलं पाऊल पडेल का? याची खात्री पूजा यांना नाही. पण संधी मिळाली तर त्या जागेवर घर बांधण्याचा मानस असल्याचं रियल इस्टेटच्या व्यावसायिक असलेल्या पूजा  सूद सांगतात.

Image: Dainik Bhaskar

हरीश महाजन यांचं बायकोच्या नावानं चंद्रावर जागा घेण्याचं नियोजन गेल्या दोन वर्षांपासून सुरु होतं. मागच्या वर्षी त्यांनी 'इंटरनॅशनल लुनार लॅण्डस सोसायटी ऑफ न्यूयाॅर्कला अर्ज केला. सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा काळ लागला. लुनार लॅण्ड्स सोसायटीनं हरीश यांना जागेच्या नोंदणीचे कागदपत्रं ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कुरियरनेही पाठवले. आपण ही जमीन कितीला घेतली हे त्यांनी ना त्यांच्या बायकोला सांगितलं ना माध्यमांना. पण आपल्या प्रिय बायकोला अनमोल आणि अनोखी भेट देण्याचं स्वप्न अखेर साकार झाल्याचं हरीश महाजन आनंदानं सांगतात. नवऱ्याला आपल्याला ही भेट बायकोला देता आली म्हणून आनंद आहे तर बायकोला कधी स्वप्नातही विचार न केलेली भेटवस्तू मिळाल्यानं गगनात मावेनासा आनंद झाला आहे. 

 

Web Title: Special Birthday Gift to wife. Husband bought a land on the moon as a birthday gift to his wife.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.