Lokmat Sakhi >Social Viral > अरे बापरे, लॅपटॉपवर पाणी सांडले? घ्या १ सोपी ट्रिक, झटपट करा ड्राय, टाळा नुकसान...

अरे बापरे, लॅपटॉपवर पाणी सांडले? घ्या १ सोपी ट्रिक, झटपट करा ड्राय, टाळा नुकसान...

Spilled Water On Your Laptop? Here’s How To Fix It : लॅपटॉपवर अचानक पाणी, चहा, कॉफी सांडले तर अशावेळी चटकन काय करता येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 03:27 PM2023-02-22T15:27:28+5:302023-02-22T15:28:19+5:30

Spilled Water On Your Laptop? Here’s How To Fix It : लॅपटॉपवर अचानक पाणी, चहा, कॉफी सांडले तर अशावेळी चटकन काय करता येईल?

Spilled Water On Your Laptop? Here’s How To Fix It... | अरे बापरे, लॅपटॉपवर पाणी सांडले? घ्या १ सोपी ट्रिक, झटपट करा ड्राय, टाळा नुकसान...

अरे बापरे, लॅपटॉपवर पाणी सांडले? घ्या १ सोपी ट्रिक, झटपट करा ड्राय, टाळा नुकसान...

टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना आपण खूप जपतो. या वस्तू खूप महागड्या त्याचबरोबर खूप नाजूकही असतात. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची योग्य ती काळजी घेतली नाही तर या वस्तू लगेच बिघडतात. या खूप महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्त करायच्या म्हणजे त्यांचा खर्चसुद्धा बराच येतो. काहीवेळा आपल्याकडून अनवधानाने या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हातातून पडतात, आपला धक्का लागून फुटतात मग यात बिघाड होतो. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना शक्यतो आपण पाणी आणि आगीपासून जरा लांबच ठेवतो. पाणी आणि आगीपासून या वस्तूंना हानी पोहोचू शकते.

सध्याच्या काळात वर्क फ्रॉम होम ही आपली जीवनशैली बनली आहे. आपल्यापैकी काहीजणांना लॅपटॉप, कॉम्प्युटरवर काम करताना सोबत पाणी, चहा, कॉफी जवळ घेऊन बसायची सवय असते. अशावेळी कामाच्या गडबडीत कधी आपला धक्का लागून पाणी, चहा, कॉफी हे लॅपटॉप, किबोर्डवर सांडते. अशा परिस्थिती या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये पाणी गेल्याने त्या खराब होऊन बिघडण्याची शक्यता असते. या महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये पाणी गेल्याने त्या खराब होऊ नयेत म्हणून एक सोपी ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो. आपल्या लॅपटॉपवर देखील अचानक काही द्रव पदार्थ सांडले तर सर्वप्रथम हे प्राथमिक उपाय करून पाहा(Spilled Water On Your Laptop? Here’s How To Fix It).

नक्की काय उपाय करता येईल ?

१. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसे की लॅपटॉप, लॅपटॉपवर काम करता असताना अचानक पाणी किंवा इतर द्रव पदार्थ सांडला तर सर्वप्रथम लॅपटॉप बंद करा.  लॅपटॉप संपूर्ण शट डाऊन करून मेन प्लगिन स्विच बंद करा. 

२. आता जर लॅपटॉपला चार्जर, पेनड्राइव्ह यांसारख्या इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कनेक्ट असतील तर सर्वप्रथम त्या वस्तू काढून घ्याव्यात. 
३. आता लॅपटॉपच्या पृष्ठभागावर असणारी बॅटरी काढून घ्यावी. 
४. त्यानंतर आपला लॅपटॉप बाहेरुन व ज्या भागातून बॅटरी काढली, त्या भागातून संपूर्णपणे मायक्रोफायबर क्लिनींग क्लॉथने पुसून कोरडा करून घ्यावा. 

५. लॅपटॉप उलटा - पालटा करुन त्यांतील संपूर्ण पाणी निथळून जाऊ द्यावे. 
६.  ज्या भागात पाणी गेले आहे त्या भागात मायक्रोफायबर क्लिनींग क्लॉथने जास्तीचे पाणी शोषून घ्यावे. 
७. आता मायक्रोफायबर क्लिनींग क्लॉथने किबोर्डच्या बटनांमधील पाणी पुसून घ्यावे. 
८. आता एका मोठा टेबलवर मोठा कॉटनचा टॉवेल अंथरून त्यावर हा लॅपटॉप उघडून उलटा ठेवावा. (व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे)

९. लॅपटॉपची स्क्रिन आणि किबोर्डचा पृष्ठभाग दोन्ही एकमेकांनच्या समोर येतील असे उघडून उलटा ठेवावा. 
१०. या अवस्थेत किमान ४ ते ५ तास लॅपटॉप असाच ठेवावा. 


 
किमान ४ ते ५ तास लॅपटॉप असा ठेवल्यानंतर त्यातील संपूर्ण पाणी निथळून जाईल. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे लॅपटॉप सुरु करावा. ही ट्रिक वापरून आपण आपल्या लॅपटॉपला खराब होण्यापासून वाचवू शकता. जर यामुळेही लॅपटॉप सुरु नाही झाला तर मेकॅनिकला दाखवा. 

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबत या गोष्टी करणे टाळा... 

१. बऱ्याचवेळा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये पाणी गेल्याने आपण त्या वस्तू प्रखर ऊन्हात वाळवायला ठेवतो. पण असे करु नये. प्रखर ऊन्हांच्या झळांमुळे या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंना हानी पोहोचू शकते. 

२. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये पाणी गेल्याने आपण त्या वस्तू तांदळाच्या डब्ब्यात भरुन ठेवतो जेणेकरून त्यातील जास्तीचे पाणी शोषले जाईल. परंतु हे करणे टाळा. 

३. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधील पाणी सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करु नका.

Web Title: Spilled Water On Your Laptop? Here’s How To Fix It...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.