Join us  

इंग्लिश- विंग्लिश सिनेमात श्रीदेवीने नेसलेल्या सुंदर साड्यांचा होणार लिलाव, दिग्दर्शक गौरी शिंदेंची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2022 1:10 PM

Auction of Sridevi's Sarees: इंग्लिश- विंग्लिश (actress of movie English Vinglish) या चित्रपटाला दि. १० ऑक्टोबर रोजी १० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्त चित्रपटाच्या दिग्दर्शिका गौरी शिंदे यांचा असा अनोखा कार्यक्रम घेण्याचा विचार आहे..

ठळक मुद्देलिलावातून येणारी रक्कम गरजू मुलींसाठी काम करणाऱ्या एनजीओला देण्यात येईल. 

२०१२ साली रिलिज झालेला 'इंग्लिश- विंग्लिश' हा चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्यासाठीही अत्यंत खास होता. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून त्या तब्बल १५ वर्षांनी मोठ्या स्क्रिनवर कमबॅक करत होत्या. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच त्यांचे चाहतेही या चित्रपटाबाबत अतिशय उत्साही होते.

 

सगळ्यांच्या अपेक्षेनुसार श्रीदेवी यांची दणक्यात कमबॅक एन्ट्री झाली आणि चित्रपट, त्याची कथा, दिग्दर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीदेवी यांची भूमिका यांची जबरदस्त चर्चा झाली. आता या चित्रपटाला १० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त गौरी यांनी या चित्रपटात श्रीदेवी यांनी नेसलेल्या साड्यांचा लिलाव करण्याची योजना बोलून दाखविली. 

 

एका चॅनलतर्फे नुकतीच गौरी यांची मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या या योजना सांगितल्या. या चित्रपटात श्रीदेवी यांनी एका मध्यमवयीन महिलेची भूमिका साकारली होती.

फक्त १० मिनिटांचा १ व्यायाम! मांड्या आणि पोटावरची चरबी होईल महिनाभरात कमी..

अशी महिला जी आतापर्यंत केवळ नवऱ्याच्या आधाराने चालत आली. घर- नवरा- मुलं हेच तिचं विश्व. त्यामुळे त्या जगापलिकडच्या जगात नवऱ्याशिवाय किंवा कुणाच्या मदतीशिवाय वावरणं तिला अवघड होतं. पण एका वळणावर मात्र तिला एकटीला प्रवास करावा लागला आणि तिने तो मोठ्या आत्मविश्वासाने केलाही. 

 

श्रीदेवी यांची अशा धाटणीची भूमिका असल्याने त्या वयोगटातल्या अनेक महिलांना ती आपलीशी वाटली. प्रत्येकीनेच त्या भूमिकेशी स्वत:ला कनेक्ट करण्याचा, त्या भुमिकेत स्वत:ला कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न केला.

गॅस बर्नरच्या आजुबाजुला काळपट डाग पडले? २ उपाय, डाग होतील स्वच्छ- गॅस चमकेल नव्यासारखा

या चित्रपटात श्रीदेवी यांचा सगळा वावर साड्यांमध्येच होता. कॉटनच्या साड्यांपासून ते सिल्कच्या साड्यांपर्यंत त्यांच्या चित्रपटात नेसलेल्या अनेक साड्या त्यावेळी गाजल्या होत्या. महिला मंडळांमध्ये त्यावर भरभरून चर्चाही होत होती. या सगळ्या साड्या गौरी यांनी व्यवस्थित ठेवल्या असून याच साड्यांचा लिलाव होणार आहे. लिलावातून येणारी रक्कम गरजू मुलींसाठी काम करणाऱ्या एनजीओला देण्यात येईल. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरल