Lokmat Sakhi >Social Viral > क्या खूब सितारा! भेटा श्रुतीला मिस ट्रांस ग्लोबल, सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ट्रान्सजेंडर; सौंदर्यासह संघर्षाची गोष्ट

क्या खूब सितारा! भेटा श्रुतीला मिस ट्रांस ग्लोबल, सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ट्रान्सजेंडर; सौंदर्यासह संघर्षाची गोष्ट

Social Viral: भारताच्या मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड आपण नेहमीच पाहिल्या.... पण यावर्षी एक सौंदर्य स्पर्धा गाजवली आहे श्रुती सितारा हिने... श्रुती आहे सौंदर्य स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली ट्रान्सजेंडर (transgender)... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 12:55 PM2021-12-17T12:55:13+5:302021-12-17T12:56:46+5:30

Social Viral: भारताच्या मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड आपण नेहमीच पाहिल्या.... पण यावर्षी एक सौंदर्य स्पर्धा गाजवली आहे श्रुती सितारा हिने... श्रुती आहे सौंदर्य स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली ट्रान्सजेंडर (transgender)... 

Sruthy Sithara, Miss trans global award- 2021 winning first Indian...  | क्या खूब सितारा! भेटा श्रुतीला मिस ट्रांस ग्लोबल, सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ट्रान्सजेंडर; सौंदर्यासह संघर्षाची गोष्ट

क्या खूब सितारा! भेटा श्रुतीला मिस ट्रांस ग्लोबल, सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ट्रान्सजेंडर; सौंदर्यासह संघर्षाची गोष्ट

Highlightsहा किताब म्हणजे जणू काही तिच्यासाठी आजवरच्या संघर्षाची फलश्रुती ठरला..श्रुतीची ही कहाणी अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली... 

जागतिक स्तरावर झालेल्या सौंदर्य स्पर्धेत (beauty contest) जिंकलेला मिस ट्रान्स ग्लोबल (Miss trans global 2021) हा मुकुट तिने घातला आणि हा किताब म्हणजे जणू काही तिच्यासाठी आजवरच्या संघर्षाची फलश्रुती ठरला.. पुरस्कार पटकविल्यानंतर केरळची (Keraka girl) ही श्रुती नेमकी आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी पटापट गुगल सर्च होऊ लागले आणि श्रुतीची ही कहाणी अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली... 

 

श्रुती ही केरळमधील वायकॉम या गावची. आज श्रुती म्हणून सगळ्या जगासमोर स्वत:ची ओळख निर्माण करणारी ही श्रुती कधी काळी मुलगा म्हणून जन्माला आली होती आणि प्रविण (Praveen) म्हणून ती ओळखली जायची. महाविद्यालयात असताना तिला या गोष्टीची जाणीव झाली एलजीबीटी कम्युनिटीच्या (LGBT) काही लोकांशी प्रविणचा परिचय झाला आणि त्याला स्वत:ची, स्वत:च्या भावनांची जाणीव झाली. या लोकांकडूनच त्याला मानसिक बळ मिळाले, हिंमत आली आणि इथून पुढचे आयुष्य प्रविण म्हणून नाही, तर श्रुती म्हणून जगायचे हे तिने ठरवून टाकले. 

 

श्रुती सध्या २५ वर्षांची असून केरळ सरकारच्या (Kerala government) न्याय विभागात कामही करते. तिला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात  झालेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्रुतीच्या रूपाने हा पुरस्कार पहिल्यांदाच भारताने पटकाविला आहे, याचा विशेष अभिमान. मिस ट्रान्स ग्लोबल ही स्पर्धा जगभरातील ट्रान्सजेंडर आणि एलजीबी  समुदायाच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पुरस्कार मिळाल्याची माहिती श्रुतीने इन्स्टाग्रामवर (instagram) पोस्ट टाकून तिच्या चाहत्यांना दिली. Be confident, be determined & believe in yourself. The rest will comes to you🔥🔥🔥..... अशी कॅप्शन तिने या फोटोंसाठी दिली आहे..

 

श्रुतीने हा पुरस्कार तिच्या दिवंगत आईला आणि ट्रान्सजेंडर कम्युनिटीमधील केरळची पहिली आरजे अनन्या कुमारी ॲलेक्स या दोघींना समर्पित केला आहे. माझी आई माझ्यासोबतच आहे आणि ती माझ्या या प्रवासाची साक्षीदार आहे, अशा भावनाही यावेळी तिने व्यक्त केल्या. 
 

Web Title: Sruthy Sithara, Miss trans global award- 2021 winning first Indian... 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.