Lokmat Sakhi >Social Viral > शाळा - ऑफिसला नेण्याच्या डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत? १ झटपट सोपा उपाय - डबे होतील स्वच्छ...

शाळा - ऑफिसला नेण्याच्या डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत? १ झटपट सोपा उपाय - डबे होतील स्वच्छ...

Stain Free Plastic Containers : प्लॅस्टिकचे डबे कितीही वेळा साबणाने घासून धुतले तरी हे तेलाचे डाग जाता जात नाहीत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 01:32 PM2023-01-20T13:32:52+5:302023-01-20T13:37:19+5:30

Stain Free Plastic Containers : प्लॅस्टिकचे डबे कितीही वेळा साबणाने घासून धुतले तरी हे तेलाचे डाग जाता जात नाहीत.

Stain Free Plastic Containers... 1 Quick and easy solution - Containers will be clean... | शाळा - ऑफिसला नेण्याच्या डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत? १ झटपट सोपा उपाय - डबे होतील स्वच्छ...

शाळा - ऑफिसला नेण्याच्या डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत? १ झटपट सोपा उपाय - डबे होतील स्वच्छ...

आपण ऑफिसला जाताना किंवा मुलांना शाळेत डबा द्यायचा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे डबे वापरतो. आपण प्लास्टिकचे व स्टीलचे अशा दोन्ही प्रकारचे डबे वापरतो. स्टीलच्या डब्यांच्या तुलनेत प्लॅस्टिकचे डबे हे वापरायला हलके असल्या कारणाने असे डबे वापरण्याला आपण प्राधान्य देतो. परंतु प्लॅस्टिकच्या डब्यांच्या तुलनेत स्टीलचे डबे स्वच्छ करण्यासाठी सोपे असतात. कधी कधीतरी प्लॅस्टिकच्या डब्यात काही तेलकट पदार्थ किंवा तेलकट भाजी नेल्यास ते सगळे तेल डब्याला चिकटते. पदार्थांतील हे तेल डब्याला तर चिकटतेच पण त्याचबरोबर डब्याच्या झाकणाच्या कडांमध्ये अडकून बसते. अशावेळी हे प्लॅस्टिकचे डबे कितीही वेळा साबणाने घासून धुतले तरी हे तेलाचे डाग जाता जात नाहीत. मग हे तेल कडांमध्ये तसेच राहून डब्ब्यांना कुबट वास येतो. अशावेळी एक सोपा उपाय वापरून हे प्लॅस्टिकचे डबे स्वच्छ करू शकतो(Stain Free Plastic Containers).

नक्की काय करता येऊ शकत ? 
हल्ली बाजारात अनेक पध्दतीचे डबे आपण टिफिन किंवा इतर पदार्थांसाठी वापरतो. त्यावर पडणाऱ्या तेलाचे डाग सहज निघत नाही. जर आपल्या प्लॅस्टिकच्या डब्यावर तेलाचे डाग पडले असतील तर ते कमी वेळेत साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स आहेत. या सोप्या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही प्लस्टिकचे डबे सहज स्वच्छ करू शकता. किचनमध्ये ठेवलेल्या किंवा टिफिन म्हणून वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या डब्यांवरील तेलाचे हट्टी डाग कसे साफ करायचे ते समजून घेऊयात. 

receitas.caseiras.online व hungrymahi या इंस्टाग्राम पेजवरून प्लॅस्टिकच्या डब्यांवरील तेलाचे हट्टी डाग कसे साफ करायचे याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ते समजून घेऊयात.  

 

तेलकट झालेल्या प्लॅस्टिकच्या डब्यांवरील तेलाचे डाग कसे काढावेत... 

१. तेलकट झालेल्या प्लॅस्टिकच्या डब्यांत ३ ते ४ थेंब लिक्विड सोपचे घाला. 
२. त्यानंतर एक टिश्यू पेपर घेऊन तो त्या डब्यांत ठेवा. 
३. मग टिश्यू पेपर भिजेल इतके पाणी त्यात ओता. 
४. आता डब्याचे झाकण लावून हा डब्बा ३ ते ४ वेळा जोरात हलवून घ्या. 
५. मग झाकण उघडून त्यातील पाणी व टिश्यू पेपर फेकून द्या. 
६. आता स्वच्छ पाण्याने हा डबा धुवून घ्या. 

हा एक सोपा उपाय करून आपण प्लॅस्टिकच्या डब्याला चिकटलेले अतिरिक्त तेल काढून डबे पूर्ववत स्वच्छ ठेवू शकतो.

Web Title: Stain Free Plastic Containers... 1 Quick and easy solution - Containers will be clean...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.