Join us  

वर्षभरासाठी घेऊन ठेवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ४ उपाय, अळ्या-किड्यांचा त्रास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2023 6:58 PM

Steps to Prevent Stored Grain Infestations धान्याला कीड लागली तर डोक्याला ताप होतो, त्यामुळे वेळीच काळजी घ्या

अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी गहू, तांदूळ, इतर कडधान्य साठवून ठेवतात. मात्र, धान्यांचा साठा ठेवल्यानंतर त्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा धान्यांना बुरशी किंवा कीड लागते. ज्यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता निर्माण होते. व धान्य फेकण्याची किंवा त्याला निवडत बसण्याची वेळ येते.

मात्र, धान्यांची योग्य काळजी घेतल्यानंतर त्यात कीड किंवा बुरशी लागत नाही. धान्यांना कीड व बुरशी लागू नये, असे आपल्याला वाटत असेल तर, या ४ टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे धान्यांना कीड, अळ्या किंवा बुरशी लागणार नाही. व धान्य वर्षनुवर्षे उत्तम टिकून राहेल(Steps to Prevent Stored Grain Infestations).

तमालपत्र

तमालपत्राचा वापर पदार्थातील चव वाढवण्यासाठी होतो. याच्या मदतीने आपण कीटकांनाही दूर ठेवू शकता. जर तांदूळ किंवा डाळीमध्ये कीटक आढळत असतील तर, धान्यांच्या डब्यात फ्रेश तमालपत्राची काही पाने ठेवा. या उपायामुळे धान्यात किडे येणार नाहीत.

स्वयंपाकघरात खूप पसारा होतो, आवरता आवरत नाही? ८ टिप्स, स्वयंपाकघर कायम चकाचक

कडूनिंब

गावाकडे धान्यांच्या साठ्यात कडूनिंबाची पानं ठेवली जातात. ज्यामुळे कीटक व अळ्या धान्यांच्या डब्यात येत नाही. यासाठी काही कोरडी कडूनिंबाची पानं एका मलमलच्या कापडात बांधून घ्या, व हे कापड धान्यांच्या डब्यात एका कोपऱ्यात ठेवा. या उपायामुळे धान्यांच्या डब्यात कीटक येणार नाहीत.

लवंग

लवंगाच्या मदतीने आपण तांदूळ आणि डाळींना कीटकांपासून सुरक्षित ठेवू शकता. यासाठी डब्यांमध्ये लवंग ठेवा. याच्या उग्र वासामुळे कीटक धान्यांपासून दूर राहतील. यासह मुंग्याही येणार नाहीत. लवंगच्या जागी आपण लवंगाच्या तेलाचा देखील वापर करू शकता.

ऑफिसमध्ये दुपारी झोप येते? ३ सोप्या ट्रिक्स, झोप चटकन उडेल

लसूण

लसणाचा वास खूप तीव्र असतो. तांदूळ व इतर धान्यांच्या डब्यात लसणाच्या काही पाकळ्या कापडात बांधून ठेवा. या उपायामुळे किडे धान्यांपासून दूर राहतील.

टॅग्स :किचन टिप्सअन्न