सध्या लग्नाचा ट्रेण्ड सुरू आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सोशल मीडिया चालू केलं की जिथे तिथे लग्नाचे हटके कंटेंट आणि फोटो व्हायरल होताना दिसून येत आहे. आपलं लग्न सर्वांपेक्षा हटके कसे होईल याचाच प्रयत्न करताना नवदांपत्य दिसत आहे. काही कपलची रॉयल एन्ट्री, तर काहींचा हटके डान्स असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण सध्या जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे तो काहीसा हटके आहे. जबरदस्ती लावून दिलेलं लग्न कसे असते हे आपण चित्रपटाच्या माध्यमातून पाहिलं असेलच, मुलीला जबरदस्ती बोहल्यावर उभं केेलं जातं. मात्र, इथे वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. इथे वधू वराच्या डोक्यावर बंदूक ठेवून जबरदस्ती करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
व्हिडिओत नवरी चक्क नवऱ्याच्या डोक्यावर बंदूक रोखत आहे. "निकाहनामावर सही करतोस की नाही?", असे म्हणत ती त्याला दम देत आहे. त्यावर नवरा "करतोय मी" असे उत्तर देत आहे. यानंतर दोघेही गमतीने हसताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला.
“जेव्हा तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडशी लग्न करता!” असे कॅप्शन देऊन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल ३.७ मिलियन व्ह्यूज आहेत तर ३४ हजाराहून अधिकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.