सोशल मीडिया गाजवणारी सोनाली आता घरोघरी प्रसिद्ध झालीये. इंस्टाग्रावर सोनालीची कोणतीही पोस्ट पडताच त्यावर काही मिनिटीत हजारो लाईक्सचा वर्षाव होतो. सोनालीचं गाण स्टेटस म्हणून ठेवणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. तिचं नवं गाणं येताच त्याच्यावर लाईक्सचा अक्षरश: वर्षाव होतो. तर सोशल मीडियार इंफ्लूएंजरर्सचा लाडका दादा प्रशांत नाकती त्याच्या एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांमुळे सोशल मीडिया गाजवतो. प्रशांत नाकती हा तरूण फक्त संगीत निर्माता नसून सुंदर सुंदर गाणीही गातो. त्यानं आदर्श शिंदे, केवल वालंज, अशा मोठ्या कलाकारांबरोबरही काम केले.
सोनाली आणि प्रशांतच्या जोडीनं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलंय. या दोघाजणांचा संगीतप्रवास कुठून सुरू झाला, त्यातील गमती जमती ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तर जाणून घेऊया प्रशांत सोनालीच्या प्रवासाबद्दल. 'सन आयलाय गो' या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताच्या हे दोघे पहिल्यांदा एकमेंकांना भेटले. या सुंदर अशा गाण्यानं सुरूवात केली त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर प्रशांत आणि सोनालीने अशा अनेक गाण्यांवर एकत्र काम केलं जी गाणी आता महाराष्ट्रातील प्रत्येक घरात चर्चेत आहेत.
दिलाची राणी, कोलीवाऱ्याची पोर, पोरी तुझ्या नादानं, लाजरान साजरा मुखडा....लाखोंच्या संख्येनं लोकांच्या पसंतीस उतरलेली ही गाणी ही या दोघांनी गायली आहेत. 'दिलाची राणी...' हे तिचं गाणं दोघांच्याही आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरलं. हे गाणं सोशल मिडियावर गेलं आणि प्रचंड गाजलं. त्यानंतर मिलियन व्ह्यूजचा सिलसिला सुरु झाला, जो आजतागायत कायम आहे.
या दोघांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर प्रशांत दादाची सोनाली ही सर्वात लाडकी बहिण आहे. प्रत्येक सुख,दु:खात ते एकमेंकांच्या सोबत असतात. एकमेकांच्या सहकार्यानं कोणत्याही गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण करतात. असं असतानाही कामाच्याबाबतीत हे दोघेही तितकेचं प्रोफेशनली वागतात. या दोघांच्या प्रत्येक गाण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते. विशेष म्हणजे नवीन तरूण तरूणाींना संधी देलेली प्रत्येक गाणी सोशल मीडियावर तुफान गाजली आहेत.
प्रशांत नाकतीचे इंस्टाग्रामवर एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स असून तो नेहमीच आपल्या इवेंट्सचे आणि मित्रांसोबतचे फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर करतो. तर सोनालीचे ३ लाखांपेक्षा इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स आहेत. सोनाली नेहमीच आपल्या इवेंट्सचे, सेलिब्रेशनचे आणि कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करते.
सोनालीनं एका मुलाखतीदरम्यान लोकमतशी बोलताना सांगितले की, ''प्रत्येक यशस्वी व्यक्तीला जसा संघर्ष करावा लागतो, तसा मलादेखील करावा लागला. मी चांगलं गाणं गाते म्हणून मला अनेक जणांकडून जेलसी अनुभवावी लागली. अनेक स्पर्धांमध्ये तर चांगलं गाणं गाऊनही मला बक्षिस मिळालं नाही.
असे अनुभव आले की खूप खचून जायचे. अक्षरश: रडू यायच. पण माझी आई मला नेहमी सांगायची की, या सगळ्या लहान-सहान गोष्टींमुळे निराश होऊ नकोस. तू सुर्य आहे. तुझी गुणवत्ता कोणीही झाकून टाकू शकत नाही. एक दिवस तू नक्कीच चमकशील. तो दिवस आता आला आहे, असं मला मनोमन वाटतं. ''