Join us

हायहिल्स घालून मॅरेथॉन धावण्याचा अजब रेकॉर्ड .. ते ही 'या' गंभीर कारणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2025 15:47 IST

Strange record of running a marathon in high heels : मॅरेथॉनमध्ये हायहिल्स घालून धावणाऱ्या मुलाचा रेकॉर्ड. समाजकार्यासाठी केला उपक्रम.

डोमेस्टिक वॉयलेंस ही जागतिक पातळीवर मोठी समस्या आहे. सर्वच देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री अत्याचार केला जातो. (Strange record of running a marathon in high heels)त्याचे दुष्परिणाम फक्त महिलेला नाही तर, त्या घरातील इतरांनाही भोगावे लागतात. लहान मुलांच्या मानसिकतेवर याचा फार वाईट परिणाम होतो. एकतर मुलं एकलकोंडी होतात. किंवा अत्याचार करणाऱ्या माणसासारखी वागायला लागतात.

समाजातील लोक डोमेस्टिक वॉयलेंस विरुद्ध आपापल्या पातळीवर आवाज उठवत असतात. पण करटिस हारर्गोव्ह या ३५ वर्षीय कॅनेडियन मुलाने फारच वेगळ्या मार्गाचा अवलंब केला. २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात करटिसने शिकागोमध्ये होणार्‍या 'द शिकागो मॅरेथॉन'मध्ये भाग घेतला होता. त्याने ती मॅरेथॉन पूर्ण केली. (Strange record of running a marathon in high heels) तो त्या स्पर्धेत फार गाजला. पण त्याच्या गतीसाठी किंवा शारीरिक तंदुरूस्तीसाठी नाही. तो सगळ्यांहून वेगळा दिसला ते त्याच्या फुटवेअरमुळे. त्याने कोणतेही स्पोर्ट्सशूज घातले नव्हते. तर चक्क तीन इंच उंचीच्या लाल हिल्स घालून २६.२ मैलाची मॅरेथॉन पूर्ण केली. (Strange record of running a marathon in high heels)त्याला कारण विचारले असता तो म्हणाला, "मी हा उपक्रम डोमेस्टिक वॉयलेंसच्या विरुद्ध चालवत आहे. महिलांवर आणि मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्या विरुद्ध माझा आवाज उचलण्यासाठी मी ही पद्धत वापरत आहे. मी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये 'फास्टेस्ट मेल मॅरेथॉन रनर इन हायहिल्स' असा रेकॉर्ड तयार करण्याचा निश्चय केला होता."

हिल्समध्ये साधे चालणेही कठीण असते. करटिसने त्यात अख्खी मॅरेथॉन पूर्ण करून नवीन जागतिक विक्रम नोंदविला आहे. त्याने आतापर्यंत ३१० मॅरेथॉन धावल्या आहेत. त्याही चॅरिटी म्हणूनच तो धावला आहे. 'टुडे डॉटकॉम'शी संवाद साधताना त्याने सर्वांना डोमेस्टिक वॉयलेंस विरुद्ध आवाज उचलण्यासाठी आव्हान केले आहे. महिलांबरोबर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध सामाजिक जागृकता निर्माण करणे हेच त्याचे ध्येय असल्याचे करटिसने सांगितले. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्याला सोशल मिडियावरही समर्थन मिळाले.

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीघरगुती हिंसामहिलामॅरेथॉन