Lokmat Sakhi >Social Viral > नवरी गेली उडत! पॅराग्लायडिंग करत नवरीने घेतली भलत्याच मंडपात एंट्री, वाजली भलतीच वाजंत्री..

नवरी गेली उडत! पॅराग्लायडिंग करत नवरीने घेतली भलत्याच मंडपात एंट्री, वाजली भलतीच वाजंत्री..

वधूची वेडिंग एन्ट्री फसली, आकशातून वधू अवतरली एका अनोळखी लग्नात अनोळखी तरुणासमोर आणि मग. गोष्ट ग्वाल्हेरमधल्या एका लग्नाची.लग्नाला थीम होती. देवदूत आणि खाण कामगाराची. वधू देवदूत म्हणून खाणकामगार असलेल्या वरासमोर अचानक उभी राहाणार आणि त्याच्याशी विवाहबद्ध होणार. थीम एकदम इंटरेस्टिंग..पण या थीमप्रमाणे लग्न करताना झालं मात्र अगदीच वेगळं. एका ट्रॅजिकॉमेडी चित्रपटात शोभेल असा प्रसंग घडला आणि लोकांच्या चर्चेचा विषय झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 03:53 PM2021-12-17T15:53:28+5:302021-12-17T16:06:50+5:30

वधूची वेडिंग एन्ट्री फसली, आकशातून वधू अवतरली एका अनोळखी लग्नात अनोळखी तरुणासमोर आणि मग. गोष्ट ग्वाल्हेरमधल्या एका लग्नाची.लग्नाला थीम होती. देवदूत आणि खाण कामगाराची. वधू देवदूत म्हणून खाणकामगार असलेल्या वरासमोर अचानक उभी राहाणार आणि त्याच्याशी विवाहबद्ध होणार. थीम एकदम इंटरेस्टिंग..पण या थीमप्रमाणे लग्न करताना झालं मात्र अगदीच वेगळं. एका ट्रॅजिकॉमेडी चित्रपटात शोभेल असा प्रसंग घडला आणि लोकांच्या चर्चेचा विषय झाला.

A strange story of theme wedding happened in Gwalior. Bride Came at alien wedding venue by paragliding but weds with stranger. | नवरी गेली उडत! पॅराग्लायडिंग करत नवरीने घेतली भलत्याच मंडपात एंट्री, वाजली भलतीच वाजंत्री..

नवरी गेली उडत! पॅराग्लायडिंग करत नवरीने घेतली भलत्याच मंडपात एंट्री, वाजली भलतीच वाजंत्री..

Highlightsशितलनं आपली लग्नाची थीम प्रत्यक्षात अस्तित्त्वात येण्यासाठी पॅराग्लायडिंगचा उपयोग करण्याचं ठरवलं.तिकडे लग्नाच्या मंडपात दीपेंश ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळी खाणीतून बाहेर आला.लग्नघटिका समीप आली आणि ठरल्याप्रमाणे शितलनं विमानातून उडी घेतली.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. तो आणखी अविस्मरणीय करण्यासाठी वधू, वर, त्यांचे कुटुंब वेडिंग प्लॅनरला हाताशी धरुन वेगवेगळ्या कल्पना लढवतात. त्यासाठी आता कोट्यावधी पैसे खर्च करण्याची तयारी सुध्दा असते. लग्न असं जे सर्व जग बघेल, लक्षात ठेवेल एवढीच त्यामागची इच्छा. मग कोणी उडत्या विमानात लग्न करतं तर कोणी समुद्राच्या तळाशी जाऊन एकमेकांच्या बोटात अंगठी घालतं. ग्वाल्हेरमधेही एक असंच लग्न पार पडलं. लग्नाला थीम होती. देवदूत आणि खाण कामगाराची. वधू देवदूत म्हणून खाणकामगार असलेल्या वरासमोर अचानक उभी राहाणार आणि त्याच्याशी विवाहबद्ध होणार. थीम एकदम इंटरेस्टिंग..पण या थीमप्रमाणे लग्न करताना झालं मात्र अगदीच वेगळं. एका ट्रॅजिकॉमेडी चित्रपटात शोभेल असा प्रसंग घडला आणि ग्वाल्हेरमधे पार पडलेलं लग्न एका वेगळ्याच कारणासाठी लोकांच्या चर्चेचा विषय झालं.

ग्वाल्हेरमधल्या दीपांश आणि शितल यांचं लग्न जमलं. दीपांश हा सीए तर शितल स्थावर मालमत्तेची निरिक्षक . लग्न ठरल्यानंतर हे लग्न विशेष पध्दतीने पार पडावं यासाठी त्यांनी देवदूत आणि खाणकामगाराची थीम ठरवली. त्यासाठी खास #DeepShit असा हॅशटॅगही तयार करण्यात आला. थीमप्रमाणे शीतल ही देवदूताच्या वेषात आकाशातून जमिनीवर खाणकामगार असलेल्या दीपांशच्या समोर अवतरणार आणि मग दोघे विवाहबध्द होणार. दीपांशसोबत जमिनीवरील सर्व वर्‍हाडी मंडळी खाणकामगाराच्या वेषात असणार. लग्नस्थळ देखील एक खाण वाटावी अशा प्रकारचं डेकोरेशन. सर्व काही व्यवस्थित ठरलं. आकाशातून अवतरण्यासाठी शीतलला तिच्या पॅराग्लायडिंगची मदत होणार होती. विकीकॅटच्या लग्नाप्रमाणे दीपशीटच्या लग्नातही वर्‍हाडी मंडळींना खाण झालेल्या मंडपात मोबाइल आणायला परवानगी नाकारण्यात आली होती.

Image: Google

शितलला फार पूर्वीपासूनच पॅराग्लायडिंगची आवड होती. ती पूर्ण करण्यासाठी तिने पॅराग्लायडिंगचे शास्त्रोक्त धडे गिरवायलाही सुरुवात केली. ती पॅराग्लायडिंगमधे इतकी रमली की पाच वर्षांपासून सुरु असलेला इंटेरियर डिझायनरचा कोर्सही सोडून दिला. लग्नानंतर पूर्ण वेळ पॅराग्लायडिंग करण्याचं ठरवलं. शितलनं आपली लग्नाची थीम प्रत्यक्षात अस्तित्त्वात येण्यासाठी पॅराग्लायडिंगचा उपयोग करण्याचं ठरवलं. त्यानुसार सगळा प्लॅन सेट झाला होता.

शेवटी लग्नघटिका समीप आली प्रत्येकानं आपआपली जागा धरली. दीपांश खाणीमधे गेला, शितलनं पॅराग्लायडिंगसाठी उडी घेण्याची पोज घेतली. सर्व वर्‍हाडी मंडळी आपल्या खाणकामगाराच्या वेषात नटून थटून उभे होते. त्यादिशी संध्याकाळी थोडा वारा सुटलेला होता. पण शितलला गुरुत्वाकर्षणाच्या सिध्दांतावर आणि तिच्या पॅराग्लायडिंग मार्गदर्शकावर पूर्ण विश्वास होता. शितलचे पॅराग्लायडिंग मार्गदर्शक हे उत्तर ग्वाल्हेरमधील प्रसिध्द पॅराग्लायडिंग प्रशिक्षक आहे. शितलनं विमानातून पॅराग्लायडिंगसाठी खाली उडी मारली. तिनं उडी मारल्यावर फक्त एकच गोष्ट योग्य घडली ती म्हणजे ती जमिनीव उतरली. पण शितल देवदूत म्हणून अवतरली ते स्वत:च्या नाही तर कोणा अनोळखीच्या लग्नात एका अनोळखी तरुणासमोर. त्याचं नाव सोमेश. पुढचे पाच मिनिटं गंभीर चर्चा झाल्यानंतर हाच देवाचा आशिवार्द आणि संकेत, पहिल्या नजरेतलं प्रेम ते हेच म्हणून शितलनं सोमेशशीच लग्न करायचं ठरवलं. सोमेशची याबाबतची पसंती नापसंतही कोणी विचारात घेतली नाही. सोमेशला तर लग्नविधी पार पडेपर्यंत आपल्यासमोर उभी असलेली देवदूत खरी नाही हे देखील माहीत नव्हतं. दीपांशशिटमधल्या शितलंचं लग्न असं पार पडलं.

Image: Google

तर तिकडे लग्नाच्या मंडपात दीपेंश ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळी खाणीतून बाहेर आला. पण त्याची नियोजित देवदूत वधू मात्र ठरलेल्या वेळी आकाशातून जमिनीवर त्याच्यासमोर अवतरलीच नाही. सर्व वर्‍हाडी मंडळी खाण कामगारांच्या वेषात आपआपल्या जागेवर उभे होते. थोड्या वेळानं लग्न मंडपात पोलिसांची एन्ट्री झाली. पोलिसांना वाटलं खाणकामागर संघटनांनी आंदोलन पुकारलेलं दिसतंय. म्हणून कारवाईसाठी पोलिस हजर झालेत. देवदूत आणि खाणकामगार #DeepShit लग्न या थीमचा पार विचका झाला. शितलचं तरी लग्न झालं पण दीपांशचा मात्र फुल पचका झाला.

Image: Google

अशा प्रकारे एका लग्नातला नाट्यमय प्रवेशाचा अंक असा विचित्र पध्दतीने पार पडला. लग्नातला हा नाट्यमय प्रवेश पाहून  वेडिंग एन्ट्री तज्ज्ञांना येत्या काळात पॅराग्लायडिंगद्वारे लग्न मंडपात प्रवेश करु इच्छिणार्‍या वधू वरांच्या संख्येत वाढ होईल अशी आशा आहे. 

Web Title: A strange story of theme wedding happened in Gwalior. Bride Came at alien wedding venue by paragliding but weds with stranger.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.