पाणीपुरी हा चाट प्रकारांतील सगळ्यांच्याच अतिशय आवडीचा पदार्थ मानला जातो. नाक्यावर असणारी छोट्याशा ठेल्यावर मिळणारी पाणीपुरी आपण अनेकदा मिटक्या मारत आवडीने खातो. पाणीपुरीच नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि पोटात जोरदार भूक लागते. देशभरात कुठेही फिरायला गेलो तरीही संध्याकाळच्या पेटपूजेसाठी आपल्यापैकी बरेचजण पाणीपुरीचा ठेला आधी शोधतात. खरंतर पाणीपुरी या पदार्थाची बात काही औरच आहे. टम्म फुगलेली कुरकुरीत पुरी बोटाने मोडून मग त्यात बटाटा, वाटण्याचा गरमागरम रगडा, बारीक चिरलेला कांदा घालून ही पुरी पुन्हा टम्म भरली जाते. त्यानंतर आंबट - गोड, तिखट चटण्यांचा जणू अभिषेकच तिच्यावर केला जातो. सगळ्यांत शेवटी पुदिन्याच्या पाण्यात न्हाहून निघालेली ही पुरी हातांच्या दोन बोटांत पकडून पटकन तोंडात ठेवली जाते. अहाहा....!!! स्वर्गसुखच असते ते.
पाणीपुरी या पदार्थाची खासियत म्हणजे याला तिखट, गोड, आंबट अशा एक सोडून अनेक चवी असतात. या तिन्ही चवींमुळे पाणीपुरी तोंडात टाकताच एक वेगळेच भाव आपल्या चेहऱ्यावर येतात. अनेक चवींचे सुख एकाच पदार्थात मिळणारी पाणीपुरी ही खरंच अनोखी डिश आहे. आजकल अगदी 'मल्टीफ्लेव्हर्ड' पाणीपुरी सुद्धा फेमस झालेली दिसत आहे. सध्या अशाच एका अनोख्या फ्लेवर्ड पाणीपुरीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं या पाणीपुरीचा फ्लेवर्ड काय ते पाहूयात(Street Vendor's 'Panipuri Ice Cream' With Chutneys and Sev is Leaving Foodies Cold).
पाणीपुरीचा हा कोणता अजबगजब फ्लेवर...
सध्या ट्विटरवर एका अनोख्या फ्लेवर्ड पाणीपुरीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत, एका डिशमध्ये पुरी मस्त रचून ठेवलेल्या दिसत आहेत. कुरकुरीत पुरी फोडून त्यात चक्क व्हॅनिला आईस्कीम घातले गेले. त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या व टोमॅटो केचप घालण्यांत आले. सगळ्यांत शेवटी पुरीवर शेव भुरभुरवून ही पाणीपुरी खाण्यासाठी सर्व्ह करण्यात आली. पुरीमध्ये बटाटा, रगड्याचे सारण व चटण्या घालून दिली जाणारी पाणीपुरी आपण खाल्ली असेलच, परंतु ही आइस्क्रीम विथ पूदिना चटणी असलेली पाणीपुरी आपण टेस्ट तरी कराल का ? सगळ्या चवींची आठवण करुन देणारी म्हणून या पाणीपुरीला ओळखलं जात, परंतु पाणीपुरीमध्ये आइस्क्रीम आणि त्यावर पुदिना चटणी ही कल्पना न केलेलीच बरी.
जलेबी तेरा अंग्रेजी नाम क्या है? पाकिस्तानी हॉटेलने इंग्रजीत सांगितलं जिलेबी म्हणजे काय...
Pani Puri lovers, here comes your chance to remove all your anger and hatred. Detoxify your souls😊
— Mohammed Futurewala (@MFuturewala) April 7, 2023
Presenting Pani Puri Ice cream with some extra chutney, ketchup and sev pic.twitter.com/Hb933EoRqZ
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स...
ट्विटरवर एका दिवसांत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत. पाणीपुरीचा हा अजबगजब फ्लेवर बघून नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य, संताप अशा अनेक भावना दिसत आहेत. मला आवडणाऱ्या पाणीपुरीसोबत असे करायची तुमची हिंमत कशी झाली?, तर दुसरीकडे पाणीपुरीचा असा फ्लेवर्ड बनवणाऱ्याला अटक करा अशी मागणी एका युजरने केली आहे. तर एका युजरने चक्क चॉकलेट फ्लेवर्ड पाणीपुरी मिळेल का अशी भावना व्यक्त केली आहे. एक युजरने जे फ्लेवर पाहिजे ते सगळे फ्लेवर मिळतील अशी कमेंट करत या पाणीपुरीची खिल्ली उडवली आहे.