बॉलीवूडची फॅशनिस्टा म्हणून सोनम कपूर (Sonam Kapoor) ओळखली जाते. तिचा फॅशन सेन्स, तिची ड्रेसिंग, मेकअप, ज्वेलरी यांचा चॉईस हा कायमच चर्चेचा विषय असतो. तिचे लूक्स नेहमीच अतिशय कॅची असल्याने ते यंगस्टर्सकडून अनेकदा फॉलो केले जातात. बाळंतपणानंतर सोनमने पहिल्यांदाच तिचे काही फोटो शेअर केले असून "बॅक इन माय होम ग्राऊंड" असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे. या फोटोमध्ये सोनम करवा चौथसाठी तयार होत आहे आणि तिचे मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट तिचा मेकअप करत आहेत. पण यापेक्षाही एक अतिशय वेगळी आणि खास गोष्ट या फोटोंमध्ये दिसते आहे.(Sonam Kapoor is doing breast feeding while her make up)
एकदा बाळ झालं की आईला तिच्या बिझी शेड्यूलमधून बाळासाठी वेळ काढावाच लागतो. बाळ जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंगवर असतं, तोपर्यंत तर आईला हातातलं सगळं काम सोडून आधी बाळासाठी धावावं लागतं. असंच काहीसं साेनमचंही झालं.
करवा चौथसाठी तिला छान तयार व्हायचं होतं. मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट असा सगळा लवाजमा तिच्या आजूबाजूला तयार होता आणि तिचा मेकअप सुरू होता. तेवढ्यात तिच्या दिड- दोन महिन्याच्या तान्ह्या बाळाला भूक लागली. त्यामुळे मग सोनमने एक भारीच आयडिया केली. मेकअप करता करता बाळाला अगदी व्यवस्थित आणि शांतपणे तिने जवळ घेतलं आणि त्याला ब्रेस्टफिडिंग केलं.
तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काही वर्षांपुर्वी ऑस्ट्रेलियाच्या मंत्री लेरिसा वॉटर Larissa Waters यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता.
थकवा दूर होऊन वाढेल स्टॅमिना, करा मलायका अरोरा सांगतेय ते अंजनेयासन, ५ जबरदस्त फायदे
यामध्ये त्यांनी पार्लमेंट बैठक सुरू असताना त्यांच्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग केलं होतं. अर्थात या दोघींची परिस्थिती वेगळी असली तरी साेनमचा व्हायरल फोटो अनेकींना त्या घटनेची आठवण करून देणारा ठरला. सोनमचा नवरा आनंद अहुजा याने हा फोटो पाहून 'Strong Mama' असं म्हणत साेनमचं कौतूक केलं.