काही मुले त्यांचे शाळेचे दिवस आठवून आनंदी असतात, तर काही उदास असतात. त्यांची प्रत्येकाची कारणं वेगळी, अनुभव वेगळे असतात. खरं तर, बालपण हा वयाचा असा टप्पा आहे. ज्यावेळेस ऐकलेल्या, सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतात. मग ती भावना प्रेमाची आणि प्रोत्साहनाची असो किंवा एखाद्याचा द्वेष, तिरस्काराची असो. शाळेच्या दिवसांत बहुतेक मुलांना अभ्यासावरून टोमणे ऐकावे लागतात. 'तू ढ आहेस, तू पास होऊ शकत नाहीस, आम्ही अ तुकडीतले तुम्ही ड तुकडीतले मस्तीखोर मुलं अश्याप्रकारे मुलांना अनेकदा अपमानाचा सामना करावा लागतो. (Student hits back at teacher )
Two years ago, me and my friend decided to text our teacher the day our results come out 😀 pic.twitter.com/iDUd6XyhZG
— famouspringroll (@hasmathaysha3) July 22, 2022
अशावेळी मुलं काहीही न बोलता मनातल्या मनात कुढतात. पण कधीकधी शिक्षक मुलांच्या बाबतीत खूपच स्ट्रिक्ट असतात. कदाचित काही मुलं अभ्यासात तितकी हुशार नसतीलही ती जास्त खोडकर असतात. मात्र अशा मुलांना योग्य मार्गावर आणण्याऐवजी काही शिक्षक त्यांच्यावर दोषारोप करू लागतात. अशा स्थितीत मुलाचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळू लागतो. (Student hits back at teacher who said she would not pass school)
तुमच्यापैकी बरेच जण या स्थितीशी सहमत असतील. पण शिक्षकाच्या या कृत्याला आपल्यापैकी कोणीही विरोध केला नसेल. पण आता एका मुलीनं शिक्षकांना चांगलंच उत्तर दिलं आहे तिचा मेसेजही व्हायरल होत आहे. @hasmathaysha3 या ट्विटर अकाउंटने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या शिकवणी शिक्षिकेला तोडीसतोड उत्तर दिलं आहे. (Student Hits Back At Teacher Who Said She Would ‘Never Make It’ After Board Results Came Out)
टोल नाक्यावर ट्रकनं जोरदार धडक दिली; जीवाची बाजी लावून तरुणी मदतीला धावली, पाहा व्हिडिओ
मुलीने तिच्या ट्यूशन टीचरला लिहिले, 'मी दहावीत तुमची विद्यार्थिनी होते. मी तुम्हाला हा संदेश पाठवत आहे कारण तुम्ही म्हणाला होता की मी मला पाहिजे ते करू शकते, परंतु मी शाळा पास करू शकणार नाही. तुम्ही प्रत्येक प्रकारे माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला.
आज मी 12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तसेच मला ज्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता आणि जो कोर्स करायचा होता, तेही मी करत आहे. हा मेसेज मी तुमचे आभार मानण्यासाठी केलेला नाही तर मी केला आहे हे सांगण्यासाठी केला आहे. पुढच्या वेळी कृपया लोकांशी नम्र वागा. विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना तुमची मदत हवी आहे'
थकलेल्या वडिलांना लेकीनं मायेनं भरवली फळं, धावत्या लोकलनं पाहिलं बापलेकीचं प्रेमळ नातं
आता तुम्ही विचार करत असाल की या मेसेजनंतर शिक्षकाला त्यांची चूक कळली असेल. पण असं काहीच झालं नाही. त्यापेक्षा शिक्षकाने दिलेले उत्तर अधिक धक्कादायक आहे. शिक्षिक म्हणाली, 'तुझ्यासोबत असण्याचे श्रेय मला अजूनही घ्यायचे आहे.' कदाचित शिक्षकाला असे वाटते की हा त्याच्या वागण्याचा परिणाम आहे, म्हणूनच त्या मुलाने अशा प्रकारे कठोर परिश्रम करून यश मिळवले.
Ok but this looks on delivered! Did she ever see the message & what was her response tho
— Fiza (@ifizatweet) July 22, 2022
पण आपल्या वागण्याने मुलीला किती वेदना झाल्या असतील याचा विचार केला नाही. अनेक विद्यार्थ्यांची अशी अवस्था असून त्यांनी या मेसेजनंतर ट्विटरवर आपली व्यथाही मांडली आहे.