भारतीय लोक जगाच्या पाठीवर कुठेही रहायला गेले तरी इथली संस्कृती, कला, साहित्य त्यांना नेहमीच साद घालतं. यात बॉलीवूडचा (bollywood song) तर मोठा वाटा. बॉलीवूडमध्ये कोणता चित्रपट येतोय, कोणता गाजतोय, कोणता अगदीच वाईट आपटला आहे.. हे सगळं सगळं परदेशातल्या भारतीयांनाही बरोबर ठाऊक असतं.. म्हणूनच तर सध्या भारतात जबदरस्त ट्रेण्डिंग असलेला आलिया भटचा 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट एनआरआय मंडळींनीही चांगलाच उचलून धरला आहे. ('Dholida' song from Alia Bhat's movie 'Gangubai Kathiawadi')
एवढंच नाही तर चित्रपटातली गाणीही चांगलीच व्हायरल झाली आहेत. आता हेच बघा ना या गाण्यांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की चक्क पॅरिसमध्ये आयफेल टॉवर समोर तीन मैत्रिणींनी (three women) मिळून ढोलिडा या गाण्यावर बहारदार नृत्य केले आहे.. या तीन मैत्रिणी भारतीय असून मध्यमवयीन आहेत. या स्पेशल डान्ससाठी त्यांनी केलेली वेशभुषाही खास आहे. तिघींपैकी एकीने लाल, एकीने हिरवी तर एकीने पांढरी साडी नेसली आहे. भारताच्या राष्ट्रध्वजात असलेले तीन रंग आणि आयफेल टॉवरसमोर सुरू असलेला त्यांचा डान्स हे सगळे अतिशय सुंदर, मोहक भासते आहे.
mansi_dancetodream या इन्स्टाग्राम (instagram share) पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नृत्या करण्यातली त्यांची सहजता, नृत्याचा आनंद आणि त्या ज्या वातावरणात नृत्य करत आहेत, तो माहोल हे सगळंच एकदा बघण्यासारखं आहे. या मुळ गाण्यावरचा डान्स अतिशय उत्कृष्ट असून या तीन मैत्रिणींनीही मुळ गाण्यातल्या स्टेप्स हुबेहुब साकारण्याचा अतिशय दमदार प्रयत्न केला आहे.